खासदारांचे पत्नीप्रेमातील भ्रमनाट्य : दगा, खोटारडेपणा, यातून खासदार झाले भ्रमिष्ट : जळी, स्थळी दिसतात, सुमित वानखेडे
किशोर कारंजेकर
वर्धा : आर्वीत राजकारण टोकाचे तिरस्काराचे झाले आहे. त्याला हातभार खासदारच लावायला लागले आहेत. आपल्या आमदारकीच्या काळात विकासकामाचे टिपूसही न हलविणारे, सुदैवाने खासदार झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या मूळ स्वभाव जाईना, या धोरणात `आता सर्व सत्ता माझ्याच घरी`, अशी स्वप्ने पडायला लागली आहेत. त्याकरीता जवळच्याच माणसांसोबत दगा, विश्वासघाताचे राजकारण करून पत्नीकरीता आमदारकी पदरी पाडून घेतली, पण लोकनाराजीत ही आमदारकी घरी येत नाही, हे पाहिल्यावर त्यांनी अजब वगनाट्य सुरू केले आहे. हा वगनाट्याचा फड लाजिरवाणा आहे. पण याची खासदार महोदयांना ना खंत ना खेद. सत्तापिपासू वृत्ती किती टोकाला जाते, त्याचे हे किळसवाणे उदाहरण आहे. यातूनच त्यांनी आर्वीजवळच्या शेतात दारू साठा पकडण्याचा तमाशाचा फड रंगविला.
या किळसवाण्या उदाहरणात ते शेतात दारूसाठा शोधायला लागले, तेथे गेल्यानंतर आपल्या पत्नीच्या निवडणूक चिन्हाचा जिंदाबाद घोष करायचेही भान राहिले नाही. त्यांच्या पत्नीच्या निवडणूक चिन्हाचा दारूसाठ्याजवळ जिंदाबाद कसा, याचा विचार ते करीत आहे. स्वत:ला अत्यंत शुद्ध म्हणत असताना तळेगाव डेपो येथे रविवारी (ता. १७ )रोजी एका बोकडाचा जीव घेतला, त्याचे मटन खाऊ घालताना तिर्थही पुरविले गेलेच होते. हा कसला भंपकपणा !
पत्नीकरीता विधानसभेची उमेदवारी मागताना मी नाही त्यातली म्हणत पहिला नाट्यअंक रंगविला आणि काही जिवाभावाने मागील १५ वर्षांपासून साथ देणार्यांचा केसाने गळा कापला. त्यांची उमेदवारी हाणून पाडत माझ्याच घरात सत्ता पाहिजे म्हणत पत्नीकरीता उमेदवारी मिळविली. मतदारांनी एकाच घरात सारी सत्ता पाहिजे काय, म्हणत नाराजी व्यक्त केली. पत्नीच्या उमेदवारीवर सत्तेचे सावट दिसायला लागल्यावर मग त्यांनी दारूसाठे शोधायला सुरुवात केली. तेथे रात्री अपरात्री पोहोचून हा दारू साठा महायुतीचे उमेदवार तसेच जनतेची विकास कामे करणारे सुमित वानखेडे यांचाच असल्याचा टाहो फोडला. त्याचवेळी येथून पैशाचा साठा रवाना झाल्याचाही त्यांना साक्षात्कार झाला. शेतकर्याच्या शेतात पैशाचा साठा ठेवतात, हे शेतकर्यांसोबत कसलाही संबंध नसताना त्यांना कसा कळला, मग तळेगावच्या मटनपाटाकरीताचा पैसा जोडीला तिर्थाची केलेली व्यवस्था कोणी केली होती, हेही त्यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी मतदार करत आहे.
मिळालेला दारूसाठा एका शेतात होता. त्याचा सुमित वानखेडे यांचा संबंध काय, असे आता लोक विचारू लागले आहे. जी चर्चा सुरू झाली, पण जे वाईट दिसेल, त्याचे खापर सुमित वानखेडे यांच्यावरच फोडावे, याशिवाय दुसरे कामच नाही. त्यानुसार हे महोदय आता गावठी दारूभट्ट्यावर जाऊन त्या भट्ट्या सुद्धा महायुतीचे उमेदवार सुमित वानखेडे यांच्याच असल्याची हे घोषणा करणार आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.
एकदा सापाला जवळ करा, पण खासदाराला जवळ करू नका, असे म्हणणारे बाऴा जगताप यांचे हृदय परिवर्तन कसे झाले, याची खमंग चर्चा सुरू आहे.
आपण पत्नीच्या विधानसभेच्या उमेदवारीकरीता किती विश्वास टाकलेल्यांची मान कापली, त्यांचा कसा विश्वासघात केला, याचा विचार करायलाही त्यांना वेळ नाही. शिवाय आपण ज्यांची संगत करतो, त्याने कापूस विकताना कापसाचे वजन वाढविण्यास त्यात मीठ किती टाकले होते, पत्नीचा जीव घेताना गावातील लोकांनी कशी धिंड काढली होती, याचेही भान राहिले नाही. अशा चारित्र्यहिनाची संगत करताना लोकांना ज्ञानाचे धडे द्यायला हे खासदार किती खालच्या पातळीवर पोहोचत आहे. यातून रंगत आहे, ते खासदार पत्नीच्या तोट्याचे गणित तसेच समर्थन वाढत आहे, महायुतीचे उमेदवार सुमित वानखेडे यांचे.