सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संजय चौधरी सरांचे दुःखद निधन
सेलू : – येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संजय चौधरी सरांचे नागपूर येथील रुग्णालयात काल रात्री उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे सेलूकरांनी एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
सेलू तालुक्यातील जनमानसात आपल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वामुळे सेवानिवृत्त केंद्रप्रमुख संजय चौधरी सुपरिचित होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरच्या वेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काल मंगळवारला रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाची वार्ता शहरात कळताच शोककळा पसरली. ते जिल्हा परिषद एम्प्लॉइज बँकेचे माजी संचालक होते. स्थानिक गजानन महाराज उत्सव समितीचे देखील सक्रिय सदस्य होते. अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या चौधरी सरांनी अनेक धार्मिक, शैक्षणिक व सामाजिक उपक्रमात आपल्या उत्कृष्ट संचालनामुळे मंत्रमुग्ध केल्याने अनेकांच्या चिरकाल स्मरणात राहतील. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा व मुलगी असा आप्तपरिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज स्थानिक मोक्षधामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या अकस्मात निधनामुळे शहरात तसेच मित्रपरिवारात शोककळा पसरली असून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.