Breaking
ब्रेकिंग

#JUSTICE FOR POOJA भावी डॉक्टर रस्त्यावर..! जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेज प्रशासनाच्या निषेधार्थ कॅंडल मार्च

2 5 4 4 2 3

सचिन धानकुटे

वर्धा : – सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या भावी डॉक्टरांनी आज कॅंडल मार्च काढत मॄतक पूजाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी पूजाला न्याय मिळालाच पाहिजे यासाठी आत्महत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी अन् विद्यापीठ प्रशासनाच्या धोरणात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याच्या संतप्त भावना त्यांनी बोलताना व्यक्त केल्यात.

सावंगी मेघे येथील जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने विद्यापीठ प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली. ही घटना आज गुरुवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली. पूजा रजनी (वय२२) रा. नागपूर असे मॄतक युवतीचे नाव आहे. पूजाच्या आत्महत्येनंतर अवघ्या काही वेळातच ती ज्या ठिकाणी खाली पडली होती, तेथील रक्ताचे डाग नाहीसे करण्यात आल्याचा आरोप भावी डॉक्टरांकडून होतोय. सदर प्रकारामुळे भावी डॉक्टरांत मोठी संतापाची लाट उसळली आहे. मॄतक पूजाच्या आईवडिलांनी देखील विद्यापीठ प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचं सांगितलं, त्यामुळे येथील भावी डॉक्टरांनी आज गुरुवारी रात्री JUSTICE FOR POOJA साठी भव्य कॅंडल मार्च काढत तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भावी डॉक्टरांनी जेएनएमसीच्या दबावाला आणि दडपणाखाली एक निष्पाप आणि निरागस जीव गमावल्याची खंत व्यक्त केली. यासोबतच सदर प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आणि विद्यापीठ प्रशासनातील चुकीच्या धोरणात आमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. जेणेकरून पुन्हा कोणी विद्यापीठ प्रशासनाच्या जाचाला कंटाळून आपला जीव धोक्यात घालणार नाही, हीच खरी मॄतक पूजाला आदरांजली ठरणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 4 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे