Breaking
ब्रेकिंग

सावरकर गौरव यात्रेला वर्धा, देवळीत उत्स्फूर्त प्रतिसाद : महिला, वृद्ध व दिव्यांगांनी सावरकर यात्रेत घेतला विशेष सहभाग

2 6 6 6 0 9

किशोर कारंजेकर

वर्धा : पारतंत्र्याच्या काळात भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी स्वतंत्र वीर सावरकरांनी केलेल्या कार्याची संपूर्ण महाराष्ट्रात पदयात्रेद्वारे माहिती पोहोचवण्याचे कार्य सध्या सावरकर गौरव यात्रेद्वारे करण्यात येत आहे. याबाबद आज वर्धा व देवळी येथे गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.

या यात्रेला वर्धेकरिता प्रमुख उपस्थिती म्हणून वर्धेचे आमदार पंकज भोयर व भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट तसेच देवळी येथे विधान परिषद आमदार रामदास आंबटकर व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सचिव राजेश बकाने, शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश ईखार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याचबरोबर या यात्रेत सर्वसामान्य नागरिकांचा ही सहभाग पाहायला मिळाला. वर्धेमध्ये या गौरव यात्रेला महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाली याचबरोबर युवक वर्ग आणि दिव्यांगांचा विशेष सहभाग होता. याचबरोबर यात्रा सुरू असताना जागो जागी वर्धा शहरातील व्यापारी वर्गाकडून सहकार्य करण्यात आले.

भारताला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या थोर महापुरुषांचा आदर काँग्रेस पक्षाला जर करता येत नसेल तर या पक्षातील कोणत्याही व्यक्तीला स्वतःला देशभक्त म्हणण्याचा अधिकार नाही असे वर्धा विधान परिषदेचे आमदार डॉक्टर रामदास आंबटकर म्हणाले तर राहुल गांधींनी यापुढे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बाबतीत एकही अपशब्द काढला तर भारतीय जनता पक्ष त्यांची खैर करणार नाही असे भाजपचे प्रदेश सचिव राजेश बकाने म्हणाले.
या गौरव यात्रेला नागरिकांच्या सोबतच स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनशैलीच्या चित्रफीत व माहिती देणारा माहिती रथ सुद्धा सामील होता त्याचप्रमाणे सावरकरांवरती आधारित विविध प्रकारच्या भजनांनी सुद्धा देवळी येथे संपूर्ण देवळी शहर दुमदुमले वर्धा शहरात या यात्रेला वर्धेचे आमदार पंकज भोयर यांच्यासोबत भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, श्याम देशपांडे, हरीभाऊ वझुरकर, श्रीधर देशमुख, तर देवळी शहरात विधान परिषद आमदार डॉ.  रामदास आंबटकर, राजेश बकाने, देवळी नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष शोभा तडस, राहुल चोपडा यांच्यासोबत गावातील नागरिक व गावकरी मोठ्या संख्येने पाहायला मिळाले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 6 6 0 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे