Breaking
ब्रेकिंग

अवैध व्यवसायांवर आळा घालण्यासाठी दारुमुक्ती अभियानाचे चक्क तहसीलदारांना साकडे ; संबंधित विभाग आदेशानंतरही कुंभकर्णी झोपेत

1 9 7 0 1 5

सचिन धानकुटे

सेलू : – तालुक्यात मोठ्या प्रमाणात फोफावलेल्या अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी संबंधित विभागाला अपयश आल्याने अखेर दारुमुक्ती अभियानाकडून तहसीलदार यांना निवेदन देत यासाठी आता आपणच काही तरी करावे, असे साकडे घालण्यात आले. तहसीलदार यांनी याविषयी तत्काळ दखल घेत संबधितांना कारवाईचे आदेशही दिलेत, मात्र संबधितांना काही अद्याप घाम फुटला नसून चक्क तहसीलदार यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याच्या प्रतिक्रिया आता व्यक्त होत आहे.

     संपूर्ण सेलू तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायांनी आपली पाळेमुळे घट्ट रोवली आहेत. यात गावठी मोहा दारु, देशी-विदेशी, मटका-जुगार आदि अवैध व्यवसायांचा समावेश आहे. येथील हिंगणी परिसर तर गावठी दारुचा हब म्हणून ओळखला जातो. बोर नदीच्या काठावर तसेच लगतच्या जंगलव्याप्त परिसरात मोठ्या प्रमाणात गावठी दारुचे गाळप केल्या जाते. दिवसाढवळ्या वाहतूक देखील केल्या जाते. आधी चोरुन लपून मिळणारी विदेशी आता चक्क ऑनलाइन मिळायला लागली आहे. एकट्या सेलू शहरात दोनशेच्या पार छोटे-मोठे व किरकोळ विक्रेते असल्याचे सांगितले जाते. मद्यपींना “पाहिजे तीथे आणि हवा तो ब्रँड” मिळत असल्याचे संपूर्ण शहरात दिसून येते. 

    पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांनी मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर आळा घातला आहे. परंतु सेलू तालुका मात्र याकरिता अपवाद ठरल्याचे मत वर्धा जिल्हा दारुमुक्ती अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतेच व्यक्त केले. याकरिता त्यांनी चक्क तहसीलदार स्वपनिल सोनवणे यांना निवेदन देत “आता आपणच काही तरी करावे” अशाप्रकारे साकडे घातले. त्यांनीही दारुमुक्ती अभियानाच्या निवेदनाची तत्काळ दखल घेत संबंधित विभागास तशा आशयाचे पत्र दिले. परंतु संबंधित विभागास अद्याप तरी घाम फुटला नसल्याची संतप्त प्रतिक्रिया दारुमुक्ती अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

    दारुमुक्ती अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच यासंदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे रोहित पवार यांच्याशी चर्चा देखील केली होती. परंतु त्यांच्याकडून देखील केवळ पोकळ आश्वासनच मिळाले. त्यामुळे आता दारुमुक्ती अभियानाच्या जिल्हाध्यक्ष पुष्पा झाडे, उपाध्यक्ष उमेश कांबळे, जिल्हा संघटक गोविंदा पेटकर आदि पदाधिकाऱ्यांनी आंदोलना शिवाय पर्याय नसल्याचे प्रतिक्रिया व्यक्त केली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे