Breaking
ब्रेकिंग

धक्कादायक | वडनेर ठाणेदाराचा अकस्मात मृत्यू : वेगवेगळ्या चर्चाना उधाण

2 7 8 0 6 6

वर्धा :- जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील वडनेर येथे पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहेय. हृदय विकाराच्या धक्क्याने झोपेतच मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मनोज वाढीवे असे मृत पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ माजली आहेय. वडनेर पोलीस स्टेशन येथे असलेल्या पोलीस क्वार्टरमध्ये पोलीस निरीक्षक मनोज वाढीवे हे राहत होते. पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली आहेय. सकाळी वडनेर पोलीस स्टेशन च्या काही कर्मचाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना फोन केला. अनेक फोन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याने कर्मचारी पोलीस स्टेशनजवळ असलेल्या क्वार्टर मध्ये पोहचले, त्यांनी दारही ठोठावले पण प्रतिसाद मिळाला नाही. अखेर दार तोडण्याचा निर्णय घेतला त्यावेळी पोलीस निरीक्षक मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ निर्माण झाली आहे.

3.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 7 8 0 6 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे