Breaking
ब्रेकिंग

लख्ख प्रकाशाच्या झगमगाटात उजळला मामा-भांजा दरगाह परिसर..! आमदार डॉ पंकज भोयर यांच्या हस्ते सौर ऊर्जा सिस्टीमचे लोकार्पण

2 2 5 4 1 7

सचिन धानकुटे

वर्धा : – पवनार येथील मामा-भांजा दरगाह परिसर नुकताच सौर ऊर्जेच्या लाईट सिस्टीममुळे लख्ख प्रकाशात उजळून निघाला. आमदार डॉ पंकज भोयर यांच्या स्थानिक विकास निधीतून येथे शुक्रवारी सौर ऊर्जा लाईट सिस्टीमचे लोकार्पण करण्यात आले.

       याप्रसंगी आमदार डॉ पंकज भोयर, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष शब्बीरअली सय्यद, भाजपचे जिल्हाध्यक्ष सुनिल गफाट, नगर परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदिपसिंह ठाकूर, माजी सभापती नौशाद शेख, भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष सलमान पठाण, संजय गांधी निराधार समितीचे फारुख शेख, सेलूचे नगरसेवक अशरफअली सय्यद, जयंत कावळे, सैफअली सय्यद, इकबाल शेख, शोएब सय्यद आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम मामा-भांजा दरगाहमध्ये आमदारांसह मान्यवरांच्या हस्ते चादर चढविण्यात आली. त्यानंतर आमदारांच्या स्थानिक विकास निधीतून उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा लाईट सिस्टीमचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी संपूर्ण दरगाह परिसर लख्ख प्रकाशाच्या झगमगाटात उजळून निघाला होता.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 5 4 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे