यशवंत विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वितरण

सचिन धानकुटे
सेलू : – तालुक्यातील हिंगणी येथील यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना शुक्रवारी गणवेश वितरीत करण्यात आला.
हिंगणी येथील यशवंत विद्यालयात माजी आमदार प्रा. सुरेशभाऊ देशमुख अमृत महोत्सव कृतज्ञता वर्ष २०२३-२४ उत्साहात साजरा करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक एन के फासगे तर प्रमुख अतिथी म्हणून टी एन काटकर, वरीष्ठ लिपीक एम एस तावडे आदि मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी इयत्ता पाचवीच्या ६० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आला .
यावेळी कार्यक्रमाचे संचालन ढवळे सर यांनी तर आभार लोहकरे सर यांनी मानले. सदर कार्यक्रमाला शिक्षक इंगोले, गावंडे, ढुमणे, डाखोळे, बुधबाबरे, चौधरी, शिक्षीका गोसावी, बारापात्रे, मलेवार, ग्रंथपाल काळे, शिक्षकेत्तर कर्मचारी तेलरांधे, बोनी देवढे, संजय थोटे, शरद चहांदे, नरेश निकोडे यांचे विशेष सहकार्य लाभले.