Breaking
ब्रेकिंग

भरदिवसा लागलेल्या आगीत चार घरांची राखरांगोळी ; विखणी (जसापूर) येथील घटना

1 9 5 8 8 2

सचिन धानकुटे

सेलू (ता. २२) : – भरदिवसा लागलेल्या आगीत चार घरांची राखरांगोळी झाल्याची घटना सिंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विखणी(जसापूर) येथे आज बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली. चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर सदर आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.

विखणी(जसापूर) गट-ग्रामपंचायतच्या आदिवासी पाड्यातील चार घरांना आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. बघता बघता आगीने सतीश कौरती, गजानन कौरती, दीपक कौरती व संजय कन्नाके या आदिवासी कुटुंबातील चार घरांची राखरांगोळी केली. चारही घरातून अचानक धूर निघत असल्याचे दिसताच शाळकरी विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केला. परंतु दुपारची वेळ असल्याने मोजकेच नागरिक उपस्थित होते. दरम्यान सदर घटनेची माहिती विखणी येथीलच अमोल सोनटक्के यांनी सिंदी नगर परिषद कार्यालय तसेच पोलीस निरीक्षकांना दिली होती, परंतु पालिकेच्या अग्निशमन दलाचा वाहनचालक गैरहजर असल्याने त्याला शोधण्यात बराचवेळ गेला. त्यामुळे अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहचण्यासाठी तब्बल एक तास उशिरा निघाली. दरम्यान विखणीच्या १३० तरुणांनी एकजूट दाखवून आग विझवण्यासाठी प्रयत्न केलेत. तब्बल चार तासांच्या अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश मिळाले. यानंतर सिंदी पालिकेचे अग्निशमन दलाचे पथक विखणीत पोहचले. या प्रयत्नात काहींना किरकोळ इजा देखील पोहचली. मात्र कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. पोलीस व तलाठी यांनी घटनास्थळी पोहचताच घटनेचा पंचनामा केला. आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण मात्र कळू शकले नाही.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 5 8 8 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे