६०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण, सेवानिवृत्त उपअभियंत्यांनी गृह जिल्ह्यात जोपासली सामाजिक बांधिलकी
सचिन धानकुटे
वर्धा : – जिल्ह्याबाहेर असलेल्या अनेक नागरिकांची आपल्या गृह जिल्ह्यातील गरजूंना मदत करण्यासाठी धडपड सुरू असते. जिल्ह्यातील रहिवासी असलेले व सध्या नागपूर येथे वास्तव्यास असलेले सेवानिवृत्त उपअभियंता विजय बाजारे यांनी नागपूर येथील रोटरी क्लब साऊथ ईस्टच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच आपल्या गृह जिल्ह्यातील देवळी, आष्टी व आर्वी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये रोटरी क्लब तर्फ विविध शालेय साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. यात नोटबुक्स, टिफीन बॉक्स, पाण्याची बॉटल, स्कूल बॅग, कंपास बॉक्स आदी शालेय साहित्याचा समावेश आहे. जवळपास सहाशे विद्यार्थ्यांना या शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कार्यकारणीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. यात प्रामुख्याने क्लबच्या उपाध्यक्ष सईराजे भोसले, माजी अध्यक्ष रत्नाकर चीमोटे, संचालक प्रवीण ढोरे, सुरेश पाध्ये, कल्याणी कावडे, ज्योत्स्ना बाजारे, मिस्वा ढोरे व सदस्य उपस्थित होते.