Breaking
ब्रेकिंग

सेलूच्या शंकरपटात मोहाडीच्या “राम आणि शाम”ने मारली बाजी, “चिमटा-सफेद”ला केले दोनदा पराभूत

८० हजार प्रेक्षकांच्या रेकॉर्ड ब्रेक गर्दीने अनुभवला शंकरपटाचा थरार

1 9 7 0 9 6

सचिन धानकुटे

सेलू : – बिहरीयाच्या “चिमटा-सफेद”ला सलग दोनदा पराभूत करीत मोहाडीच्या रमेश पटेलांची “राम आणि शाम” नामक बैलजोडी ही येथील शंकरपटात प्रथम पुरस्काराची मानकरी ठरली. यावेळी ७० ते ७५ लाखांच्या बैलजोड्यांचा हा चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक असा थरार जवळपास ८० हजार प्रेक्षकांनी “याची देही याची डोळा” प्रत्यक्षात अनुभवला.

       सेलूत ३५ वर्षाच्या प्रदिर्घ कालखंडानंतर प्रथमच साहसिक जनशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोटंबकार यांनी भव्य अशा शंकरपटाचे आयोजन केले होते. या शंकरपटात विदर्भातील तसेच मध्य प्रदेशातील एकूण ६८ बैलजोड्यांनी आपला सहभाग नोंदवला. एकापेक्षा एक सरस अशा सूपरफास्ट बैलजोड्यांच्या अगदी कमी सेकंदात अंतर पार करण्याचा हा थरार गेल्या सहा दिवसांपासून येथे रंगला होता. शहरात बऱ्याच कालावधीनंतर प्रथमच शंकरपट भरल्याने साहजिकच त्याची आबालवृद्धांना उत्कंठा होती. त्यामुळे काल फायनलच्या दिवशी प्रेक्षकांच्या गर्दीने सगळेच रेकॉर्ड मोडीत काढले नाही तर चक्क उध्वस्त केले. जवळपास ८० हजार प्रेक्षकांनी हा अत्यंत उत्कंठावर्धक असा थरार अनुभवला.

     येथील शंकरपटात काल गुरुवारी पंधरा पुरस्कारासाठी तब्बल ३० बैलजोड्या तर दोन प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी चार बैलजोड्या धावल्यात. यात मध्य प्रदेशातील बिहरीयाच्या अजिम पटेल यांच्या “चिमटा-सफेद”वर मोहाडीच्या रमेश पटेल यांच्या “राम आणि शाम” नामक बैलजोडीने दोनदा मात करीत प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी प्रथम क्रमांकासाठी झेंडी पडण्याच्या आधीच बैलजोडी निघाल्यामुळे दोन्ही बैलजोडीचे मालक व पंचकमेटीच्या निर्णयानंतर अखेर प्रेक्षकांना हा थरार प्रत्यक्ष दोनदा अनुभवण्याची संधी मिळाली. परंतु दोन्ही वेळी “राम आणि शाम”नेचं बाजी मारली. शिवणी येथील सतिश शुक्ला यांची “पवन-देवा” नामक बैलजोडी ही दुसऱ्या तर बिहरीया येथील अजिम पटेल यांची “लाल-पिला” ही तीसऱ्या क्रमांकाची मानकरी ठरली. चतुर्थ पुरस्कार सेलू येथीलच बालू दंढारे यांच्या “हिरा-तूफान”ने तर पाचवा पुरस्कार धामणगांव वाढोणा येथील प्रविण निखाडे यांच्या “नागोर-धवळा”ने पटकावला. सहावा पुरस्कार अक्षय तळवेकर यांच्या “पंढरपूरी-नाटा”, सातवा पुरस्कार गोपालपूरच्या “राजा-टायगर”, आठवा पुरस्कार नागपूरच्या “बोरी-माडी”, नववा पुरस्कार आर्णीच्या “राम-शाम”, दहावा पुरस्कार ज्ञानेश्वर लांडे यांच्या “लालू-फंटी”, अकरावा पुरस्कार बालू मेघे यांच्या “शिव-शंभू”, बारावा पुरस्कार वायगांवच्या “सोन्या-लाखा”, तेरावा पुरस्कार धोटीवाडा येथील “बलवंत-बादशहा”, चौदावा पुरस्कार धोटीवाडा येथीलच “पुष्पी-पुष्पराज” तर पंधरावा पुरस्कार प्रविण सुटे यांच्या “लोकेश-अभय” नामक बैलजोडीने पटकावला. याप्रसंगी दफ्तरी सिडसचे संचालक वरुण दफ्तरी यांनी उत्कृष्ट बैलजोडी ड्रायव्हर यांना रोख पुरस्कार देत त्यांचा उत्साह द्विगुणित केला. 

   याप्रसंगी पार पडलेल्या बक्षीस वितरण सोहळ्याला खासदार रामदासजी तडस, साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष तथा शंकरपटाचे संयोजक रवींद्र कोटंबकार, दफ्तरी सिडसचे संचालक वरुण दफ्तरी, बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगार, शंकरपटाचे अध्यक्ष मारोतराव बेले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय जयस्वाल, किशोर काटोले, चुडामन हांडे, दिलीप गावंडे आदि मान्यवर उपस्थित होते. या शंकरपटाचे संचालन व्हॉईस ऑफ मिडीयाचे तालुकाध्यक्ष सचिन धानकुटे, सेवानिवृत्त शिक्षक संजय चौधरी, संतोष डाखोळे सर यांनी केले. शंकरपटाच्या यशस्वितेसाठी साहसिक जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी व सदस्य, शंकरपट आयोजन समितीचे सदस्य यासह सिग्नल मास्तर पूंजारामजी, झेंडी मास्तर बंडू गोहणे, बंटी मेघे, अरुण कोटंबकार, प्रकाश कोटंबकार, बाळा टालाटुले, अशोक कांबळे, सागर राऊत, कामगार सेनेचे रवींद्र दुरतकर, जगदीश पांडे, गणेश रेंगे यांनी अथक परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 9 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे