पोलीस महानिरीक्षकांनी घेतला सेलूच्या महिला समुपदेशन केंद्राचा आढावा ; महिलांशी संवाद साधत केली चर्चा

सचिन धानकुटे
सेलू : – पोलीस महानिरीक्षक दिपक पांडे यांनी आज येथील पोलीस ठाण्यातील महिला समुपदेशन केंद्राला भेट देत महिलांशी संवाद साधला.
याप्रसंगी महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दिपक पांडे, टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबईच्या विभागीय समन्वयक प्रतिभा गजभिये, जिल्ह्यातील महिला व बाल विकास अधिकारी प्रशांत विधाते तथा पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी पोलीस महानिरीक्षकांनी स्थानिक महिला समुपदेशन केंद्राची पाहणी करीत तेथील कामकाजाचा आढावा घेतला. येथील समुपदेशकांशी तसेच महिलांशी संवाद साधत सविस्तर चर्चा केली.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन महिला समुपदेशन केंद्राच्या समुपदेशिका स्मिता बोरकर(सूरकार) यांनी तर आभार समुपदेशक मनोज चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संरक्षण अधिकारी अतुल चौधरी, ज्ञानदेव वनवे, गणेश राऊत, भावना दांडेकर, राजू वैद्य, श्याम थाटे, संदीप किरमे यांनी सहकार्य मिळाले.