Breaking
ब्रेकिंग

भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात सात जण जखमी ; जखमींत पाच बालकांचा समावेश

1 9 7 0 1 5

सचिन धानकुटे

सेलू : – मोकाट कुत्र्यांनी गावात चांगलाच हैदोस घालत सात जणांना जखमी केल्याची घटना नजिकच्या रेहकी येथे शुक्रवारी घडली. यातील जखमींत पाच बालकांचा समावेश असल्याने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

रेहकी येथे काल शुक्रवारी दुपारच्या सुमारास अंगणात खेळत असलेल्या एका चिमुकलीवर काळ्या रंगाच्या कुत्र्याने अचानक हल्ला चढवला. यात तीच्या चेहऱ्याला व हाताला गंभीर स्वरूपाची इजा झाली. त्यानंतर ह्याच कुत्र्याने रस्त्याने जात असलेल्या अंशू सुरेश मानके (वय७) ह्याच्या हाताला चावा घेत जखमी केले. त्यानंतर आपल्याच घरात बसून असलेल्या अनुष्का दामोधर धाबर्डे(वय१०) हिच्या उजव्या हाताच्या दंडाला सदर कुत्र्याने गंभीर इजा केली. एकामागून एक घडणाऱ्या सदर घटनांमुळे नागरिक चांगलेच भयभीत झाले आणि त्यांनी सदर कुत्र्याचा बंदोबस्त करण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी रोशन दिलीप सराटकर(वय१०) ह्याच्या पार्श्वभागाचा कुत्र्याने चावा घेतला. याच धडपडीत सिकंदर गोडघाटे नामक तरुणाच्या पायावर देखील कुत्र्याने आपले दात रोवले तर परिष शिंदे ह्यांच्या पार्श्वभागाला गंभीर इजा पोहचवली. शेवटी चार वाजताच्या सुमारास “त्या” धोकादायक ठरलेल्या कुत्र्याचा नागरिकांनी खात्मा केला. कालची घटना ताजी असतानाच आज शनिवारी दुपारी बारा वाजताच्या सुमारास एका पांढऱ्या रंगाच्या कुत्र्याने आणखी एका बालकांवर हल्ला चढवला. परंतु नागरिकांनी प्रसंगावधान राखत वेळीच आरडाओरडा केला असता त्या झटापटीत सदर बालक रस्त्यावर खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली. यातील सगळ्या जखमींना सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, तेथे उपचारानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. मात्र गावात अजूनही कुत्र्याची दहशत कायम असून नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे