Breaking
ब्रेकिंग

भामट्यांचा सेलूच्या इसमास गंडा..! सोन्याच्या दोन अंगठ्या घेऊन पसार

2 0 3 7 2 7

सचिन धानकुटे

सेलू : – येथील एका इसमास दोन भामट्यांनी गंडा घातल्याची घटना वर्धा शहरातील रिंगरोडवर काल सायंकाळच्या सुमारास घडली. दिलीप रामभाऊ खडसे रा. भगत ले-आऊट असे फसवणूक झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी सावंगी पोलिस ठाण्यात उशिरा रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

      मिळालेल्या माहितीनुसार, दिलीप खडसे हे आपल्या एमएच ३२ एव्ही ९५२३ क्रमांकाच्या इलेक्ट्रिक वाहनाने नाचनगांव येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. तेथून काल शुक्रवारी सायंकाळी सव्वा चार ते साडेचार वाजताच्या सुमारास वर्ध्याहून सेलूच्या दिशेने येत होते. दरम्यान शहराबाहेरील रिंगरोडवर शांतीनगर ते हिंदी विश्वविद्यालया दरम्यान त्यांच्या वाहनासमोर एक ग्रे रंगाची बुलेट येवून अचानक थांबली. त्यावरील दोन भामट्यांनी खडसे यांना आम्ही सरकारी माणसे असून पुढे लूटमार सुरू असल्याची थाप मारली. तुम्ही तुमच्याकडील सोन्याची आभुषणे अंगावर घालून जावू नका, आधी ती काढून घ्या, असे म्हणताच खडसेंनी आपल्या हातातील एक साडेसात ग्रँमची व एक आठ ग्रँमची अशा दोन्ही सोन्याच्या अंगठ्या भामट्यांच्या मढ्यावर घातल्या आणि भामटे क्षणात त्याठिकाणाहून नौ दो ग्यारह झालेत. दरम्यान खडसे यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी याप्रकरणी सावंगी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात भामट्यांच्या विरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.

 

फसवणूकीच्या घटनात वाढ

फसवणूकीच्या घटनात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोरटे एकच फंडा वापरून सातत्याने गंडा घालत असल्याचे वरकरणी दिसते. सर्वसामान्य नागरिक देखील भामट्यांच्या नादी लागत असल्याने चोरट्यांचे फावत आहे. सेलू शहरात अशाप्रकारच्या चार घटना घडल्या असून ही पाचवी सेलूच्या इसमाशी घडलेली घटना आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 3 7 2 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे