Breaking
ब्रेकिंग

वर्ध्यातील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्द ; समाजकल्याण आयुक्तांचा आदेश ; शिक्षणक्षेत्रात खळबळ

1 9 6 6 7 5

सचिन धानकुटे

वर्धा : – विविध घोटाळ्यांचा ठपका असलेल्या येथील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आली आहे. राज्याच्या समाजकल्याण आयुक्तांनी याबाबतचा आदेश काढला आहे. 

    आर्वीचे आमदार दादाराव केचे यांनी जिल्ह्यातील अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाच्या गैरव्यवहार प्रकरणी विधीमंडळाच्या अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. यासंदर्भातील चौकशीचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. यातील चौकशी समितीला सदर महाविद्यालयाच्या गैरकारभारविरुद्ध गंभीर स्वरूपाच्या त्रुटी आढळून आल्या होत्या. यात लघुलेखक तसेच वसतीगृह सफाईगार आदि पदांची भरती करतांना नियमानुसार कार्यवाही झाली नसल्याचे चौकशीत समोर आले. सदर पदांची सेवा समाप्त करण्यात यावी, तसेच वेतनापोटी देण्यात आलेले अनुदान संस्थेकडून वसूल करण्यात यावे. सदर महाविद्यालय संचालित करणारी संस्था अनिकेत शिक्षण संस्था, भंडारा यावर प्रशासक देखील नेमण्याची शिफारस चौकशी समितीने केली आहे. 

गुणवाढ प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलेल्या प्राध्यापकाला संस्थेने सेवेत कायम ठेवले, असाही ठपका ठेवण्यात आला होता. त्या अनुषंगाने अनिकेत समाजकार्य महाविद्यालयाची मान्यता काढण्याचा निर्णय घेण्यात आला. 

    ह्यास दुजोरा देताना सहाय्यक समाज कल्याण आयुक्त प्रसाद कुलकर्णी यांनी सदर महाविद्यालयाची मान्यता काढण्यात आल्याने या महाविद्यालयात प्रवेशीत विद्यार्थ्यांचे प्रवेश इतरत्र वर्ग करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

3/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 6 6 7 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे