दीपचंदच्या मैदानावर तीन दिवस रंगणार कबड्डीचा थरार ; सेलूत उद्यापासून जिल्हा स्तरावरील कबड्डी खेळाडूंची होणार निवड
सचिन धानकुटे
सेलू : – येथील दीपचंद चौधरी विद्यालयाच्या मैदानावर उद्यापासून तीन दिवस कबड्डीचा थरार रंगणार असून जिल्हा स्तरावरील कबड्डी खेळाडूंची निवड प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यातील सेलू शहरात प्रथमच ही निवड प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याने खेळाडूंचा उत्साह द्विगुणित झाला आहे.
साहसिक जनशक्ती संघटना, गर्जना सामाजिक संघटना व वर्धा जिल्हा हौसी कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा स्तरावरील कबड्डी खेळाडूंची निवड प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. स्थानिक दीपचंद चौधरी विद्यालयाच्या मैदानावर ता. १, २ व ३ डिसेंबर रोजी हा कबड्डीचा थरार रंगणार आहे. यात सीनियर पुरुष व महिला(सूपरलीग) निवड चाचणी स्पर्धेसाठी पुरुषांकरीता ७५ किलो वजन गट नेमण्यात आला असून ह्या वजनाच्या आतील कोणताही खेळाडू स्पर्धेत भाग घेवू शकतो.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस निरीक्षक तिरुपती राणे तर उद्घाटक तहसीलदार स्वपनिल सोनवणे, प्रमुख अतिथी म्हणून सेलू शिक्षण मंडळाचे नवीनबाबू चौधरी, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक तथा कोटंबा येथील सरपंच रेणुका कोटंबकार, नगरसेविका कविता किशोर काटोले, मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे, वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महेशसिंग ठाकूर, साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोटंबकार प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.
कबड्डी निवड चाचणी स्पर्धेचा ता.३ रविवारला बक्षीस वितरण सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे सभापती केशरीचंद खंगार तर प्रमुख अतिथी वर्धा बाजार समितीचे सभापती अमित गावंडे, विशेष अतिथी म्हणून भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक पवन तिजारे, सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीचे तथा दफ्तरी सिडस् कंपनीचे संचालक वरुण दफ्तरी, सेलू शिक्षण मंडळाचे नवीनबाबू चौधरी, वर्धा जिल्हा हौशी कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष महेशसिंग ठाकूर, साहसिक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवींद्र कोटंबकार, मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे आदि मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी बाहेरगावाहून येणाऱ्या स्पर्धकांच्या निवास तसेच भोजनाची व्यवस्था साहसिक जनशक्ती संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली असून जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या निवड चाचणीत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजक सागर राऊत शहराध्यक्ष साहसिक जनशक्ती संघटना सेलू व मित्र परिवार यांनी केले आहे.