चांद्रयान-३ कधी लँडिंग करणार..? कुठे पाहता येणार थेट प्रक्षेपण..? वाचा सविस्तर आरएनएन न्युज नेटवर्कवर
Exclusive Chandrayaan-3 : – ‘चांद्रयान-३’ मोहिमेवर संपुर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. अवघ्या काही तासांत चांद्रयान-३ चंद्रावर उतरणार आहे. इस्त्रोने एक नवीन व्हिडीओ शेअर करीत या मिशनबाबतची उत्सुकता आणखी वाढवली आहे. मिशन निर्धारीत वेळेतच पूर्ण होणार असल्याचं देखील इस्त्रोने म्हटलं आहे.
इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, ‘चांद्रयान-३’ ची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग ठरलेल्या वेळेत होणार आहे. भारतीय विज्ञान, इंजीनिअरिंग, औद्योगिक आणि उद्योगासाठी हे मिशन मैलाचा दगड ठरणार आहे. अंतराळातील भारताच्या प्रगतीचं हे प्रतिक असेल. मिशन वेळेत पूर्ण होईल. त्यामुळे सिस्टिमची वारंवार पाहणी केली जात आहे. तसेच या मिशनमध्ये भाग घेणारी लोक अत्यंत उत्साहाने काम करत आहेत. त्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे.
‘चांद्रयान-३’ आज बुधवारी २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार. त्यामुळे संपूर्ण देशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हे सॉफ्ट लँडिंग “याची देही याची डोळा” पाहण्यासाठी देशवासी उत्सुक आहेत. ‘चांद्रयान-३’ आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटाने चंद्रावर पाऊल ठेवणार आहे.
*चांद्रयान-३ चं कसं होणार लँडिंग..?*
*पहिला टप्पा*
या टप्प्यात यानाची लेव्हलपासून ३० किलोमीटरचे अंतर कमी करून ७.५ किलोमीटरपर्यंत आणले जाईल.
*दुसरा टप्पा*
चंद्राच्या पृष्ठभागापासून ते चांद्रयानाचं अंतर ६.८ मीटर पर्यंतचं असेल. या टप्प्यापर्यंत यानाचा वेग ३५० मीटर प्रति सेकंद असेल. म्हणजे सुरुवात साडेचार पट कमी असेल.
*तिसरा टप्पा*
यात यानाला चंद्राच्या पृष्ठभागापासून ८०० मीटर उंचीवर नेलं जाईल. इथे दोन थ्रस्टर इंजिन उतरवले जातील. या टप्प्यात यानाचा वेग शून्य टक्के सेकंदाच्या जवळ नेला जाईल.
*चौथा टप्पा*
या टप्प्यात यानाला पृष्ठभागाच्या १५० मीटरपर्यंत आणलं जाणार आहे. याला व्हर्टिकल डिसेंट म्हणतात. म्हणजे उभी लँडिंग होईल.
*पाचवा टप्पा*
या टप्प्यात यानाला लागलेल्या सेंसर आणि कॅमेऱ्यातून मिळणारे लाइव्ह इनपूट आधी स्टोअर केलेल्या रेफरन्स डेटाशी जुळवले जातील. या डेटामध्ये ३९०० फोटो आहेत. हे फोटो चांद्रयान-३ उतरण्याच्या ठिकाणाचे आहेत. या फोटोवरून यानाला थेट चंद्रावर कुठे उतरवायचं याचा निर्णय घेतला जाणार आहे. यान उतरवण्याची जागा योग्य वाटली नाही तर यान उजव्या किंवा डाव्या बाजूला वळवलं जाईल. या टप्प्यात यान चंद्राच्या पृष्ठभूमीच्या ६० मीटरपर्यंत जवळ नेलं जाईल.
*सहावा टप्पा*
हा शेवटचा टप्पा आहे. या टप्प्यात लँडरला थेट चंद्रावर उतरवलं जाणार आहे.
*कुठे पाहता येणार लाइव्ह प्रसारण?*
भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटापासून हे प्रक्षेपण होणार आहे.