Breaking
ब्रेकिंग

उपजिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली सभापतींची निवड

1 9 7 0 1 5

सचिन धानकुटे

सेलू : – येथील नगरपंचायतच्या सभागृहात आज उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत स्थायी समितीसह सभापतींची निवड करण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी सुप्रिया डांगे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी पुनम कळंबे यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. यात नगराध्यक्ष स्नेहल अनिलराव देवतारे यांची स्थायी समितीच्या सभापती म्हणून तर उपनगराध्यक्ष रेखाताई चंद्रकांतजी खोडके यांची स्थायी समिती सदस्य तथा शिक्षण, आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापती पदी निवड करण्यात आली. शैलेंद्र फुलचंदजी दफ्तरी यांची स्थायी समिती सदस्य तथा पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती म्हणून तर किशोर मनोहरराव गुजर यांची स्थायी समिती सदस्य तथा बांधकाम समितीचे सभापती म्हणून तर रुखसार हमीदखाँ पठाण यांची स्थायी समितीच्या सदस्य तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून तर उमा गणपतराव वांदिले यांची महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती म्हणून तर कविता किशोर काटोले यांची स्थायी समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आल्याची माहिती उपमुख्याधिकारी रघुनाथ मोहिते यांनी दिली.
यावेळी नगरपंचायत सभागृहात नगरसेवक राजेश जयस्वाल, संदीप सांगोळकर, रामनारायण पाठक, अशरफअली सय्यद, किशोर इरपाते, चंदा सावरकर, गिता रामगढीया, स्वीकृत नगरसेवक राजेंद्र मिश्रा, दिनेश माहुरे उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे