सेलूत रविवारी संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त भव्य पालखी व दिंडी सोहळा
सचिन धानकुटे
सेलू : – शहरातील श्री संताजी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा श्री विठ्ठल रुक्मिणी प्राणप्रतिष्ठा दिवस तथा श्री संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त रविवार ता.१४ जानेवारीला भव्य पालखी व दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने रविवारी ता.१४ जानेवारीला सकाळी ९ वाजता वडगाव रोड स्थित श्रीसंत संताजी जगनाडे महाराज देवस्थानातून या दिंडी सोहळ्याला सुरुवात होईल. सेलू नगरीतून प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत ही दिंडी मंदिरात आल्यानंतर याची सांगता होईल. त्यानंतर मंदिराचे आवारात हभप गुरूवर्य प्रमोद महाराज पानगुळे वारकरी शिक्षण संस्था आळंदी यांचे काल्याचे किर्तन होणार असून यावेळी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे स्वागत तथा मार्गदर्शन होणार आहे. या कार्यक्रमाला खासदार रामदास तडस, आमदार डॉ पंकज भोयर, आमदार रामदास आंबटकर, सेलूच्या नगराध्यक्ष स्नेहल देवतारे, माजी शिवसेना जिल्हाप्रमुख रविकांत बालपांडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात येईल. या कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष मनोहर सोमनाथे, सचिव उकेश चंदनखेडे सह विश्वस्त मनोहर वाघमारे, अनिल देवतारे, शामराव शेंडे, अशोक कलोडे, महादेव वांदिले, विठोबाजी लाडेकर, भास्कर दंढारे, संजय धोंगडे, राजेंद्र दंढारे, नरेश वांदीले, रविंद्र आदमने, विनोद शिंदे, विजय खोडे, भगवान तितरे आदिंनी केले आहे.