Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला जिल्हा उपाध्यक्षपदी शितल तिवारी तर जिल्हा सहसचिव पदी सुचिता सातपुते

2 0 8 9 6 9

हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात महिला काँग्रेसची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.  यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेस शरद पवार गट जिल्हा उपाध्यक्ष पदी शितल तिवारी, जिल्हा सहसचिव पदी सुचिता सातपुते, हिंगणघाट विधानसभा उपाध्यक्ष पदी विद्या गिरी, शहर उपाध्यक्ष पदी दिपाली रंगारी, शहर सरचिटणीस पदी सविता गिरी, शहर पश्चिम उपाध्यक्ष अंकिता गहलोत, शहर सचिव पदी सोनल बाभुलकर, शहर सह सरचिटणीस पदी निता मेश्राम, कार्यकारी सदस्य सुवर्णा पेंदाम, पूजा कांबळे, मिनल मुन यांची नियुक्ती करण्यात आली.

शरद पवार गटाचे महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, संसदरत्न सुप्रिया सुळे यांच्या मार्गदर्शनात महिला जिल्हाध्यक्ष ज्योती देशमुख, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले,पूर्व विदर्भ अध्यक्षा डॉ.सुरेखा देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वांचे नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

याप्रसंगी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग,समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील,माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक वांदिले,जिल्हा सहसचिव गजानन शेंडे, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अशोक डगवार,मंगेश गिरडे, सुभाष चौधरी, अमोल बोरकर, गणेश वैरागडे, हिंगणघाट शहराध्यक्ष मृणाल रिठे, शहर कार्याध्यक्ष सिमा तिवारी, विधानसभा अध्यक्ष निता गजबे, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभूलकर, समुद्रपूर तालुका संघटक वैशाली लोखंडे, हिंगणघाट तालुका अध्यक्ष शगुप्ता शेख, शहर सचिव अर्चना नांदूरकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 8 9 6 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे