प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या शहराध्यक्ष पदी चिंतामण कुंभारे
सेलू : – येथील प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या शहराध्यक्ष पदी नुकतीच चिंतामण कुंभारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
प्रहार अपंग क्रांती संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कुऱ्हाडकर, संपर्क प्रमुख अमोल क्षीरसागर यांच्या सुचनेनुसार सेलू तालुकाध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली प्रहारची गुरुवार ता.६ रोजी बैठक पार पडली. याप्रसंगी शहराध्यक्ष पदी चिंतामण कुंभारे यांची निवड करण्याचा ठराव एकमताने पारित करण्यात आला. चिंतामण कुंभारे यांची शहराध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी चिंतामण कुंभारे यांनी बोलताना दिव्यांग बांधवांनी माझ्यावर विश्वास ठेवून शहराध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. यासोबतच संघटना आणि दिव्यांगासाठी तन, मन, धनाने सेवा करण्याचं अभिवचन यावेळी दिले.
या बैठकीला ललित शेंडे, उमेश पराते, वासुदेव धानकुटे, गजानन वांढरे, हैदर अली, प्रशांत तडस, शारदा कदम यांच्यासह दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.