दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाची १००% निकालाची परंपरा कायम
सचिन धानकुटे
सेलू : – येथील दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाचा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून महाविद्यालयाने आपली शतप्रतिशत निकालाची परंपरा यंदाही कायम राखली.
दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या विज्ञान शाखेतून एकूण १३६ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली होती. यापैकी १३६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून महाविद्यालयाने आपली शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली. यामध्ये प्राविण्य श्रेणीत १, प्रथम श्रेणीत ८, द्वितीय श्रेणीत ७९ तर तॄतीय श्रेणीत ४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यावेळी सुमित प्रविण झाडे ह्याने महाविद्यालयातून ८१.६७ टक्के गुण मिळवत प्रथम, तन्वी विजय उड्डाण हिने ७४.८३ टक्के गुण मिळवत द्वितीय तर तेजस नारायण भुते ह्याने ७१.५० टक्के गुण मिळवत तॄतीय क्रमांक प्राप्त केला.
याप्रसंगी माध्यमिक शालांत परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य सुहासिनी पोहाणे, कनिष्ठ महाविद्यालय विभाग प्रमुख मंगेश वडूरकर, राजेश गौर, राजेश कनोजीया, चंदनखेडे मॅडम, डायगव्हाणे मॅडम, सेलू शिक्षण मंडळाचे नविनबाबू चौधरी, अनिलकुमार चौधरी, पर्यवेक्षक विजय चांदेकर, मकरंदे मॅडम यांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.