ब्रेकिंग
बारावीत अव्वल ठरलेल्या “भुमिका”चे सेलू तालुका पत्रकार संघाकडून अभिनंदन

1
2
7
1
1
8
सचिन धानकुटे
सेलू : – उच्च माध्यमिक शालान्त परिक्षेच्या निकालात तालुक्यातून अव्वल ठरलेल्या “भुमिका”चे सेलू तालुका पत्रकार संघाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले.
येथील दिपचंद चौधरी ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्सची विद्यार्थीनी असलेल्या भुमिका नानकराम रुपवाणी हीने उच्च माध्यमिक शालान्त परिक्षेच्या निकालात घवघवीत यश प्राप्त केले. यंदा दिपचंदचा निकाल ९८.४० टक्के लागला. शाळेतून एकूण १२५ विद्यार्थी परिक्षेला बसले होते, यापैकी १२३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात भुमिकाने ८२.८३ टक्के गुण घेत ती तालुक्यातून प्रथम आली. यावेळी सेलू तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रफुल्ल लुंगे यांनी भुमिकाच्या निवासस्थानी जात पुष्पगुच्छ देऊन तीचे अभिनंदन केले. याप्रसंगी भुमिकाची आई, सुवर्णाताई लुंगे व पत्रकार संघाचे सदस्य उपस्थित होते.
1
2
7
1
1
8