Breaking
ब्रेकिंग

@INCMaharashtra नामक एक्स अकाऊंटवर आक्षेपार्ह मजकूर प्रसिद्ध केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, रामदास तडस यांची रामनगर पोलिसांत तक्रार

1 9 7 0 8 0

किशोर कारंजेकर 

वर्धा : – भाजपचे लोकसभा उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधात सोशल मीडियावरील एक्स अकाऊंटवर तथाकथित आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी अँडमीनसह संबधितावर रविवारी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी रामनगर पोलीस अधिक तपास करीत आहे.

       मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरील एक्स अकाऊंटवर भाजपचे लोकसभा उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधातील @INCMaharashtra च्या माध्यमातून खोडसाळ बनावटी व बदनामीकारक अर्धवट असा आक्षेपार्ह व्हिडीओ ता.२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आला. सदर आक्षेपार्ह व्हिडीओ याआधी सुद्धा म्हणजे पाच वर्षापूर्वी ३ एप्रिल २०१९ रोजी अशाचप्रकारे मतदारांची दिशाभूल करण्यासाठी प्रसारित करण्यात आला होता. तेव्हा सुद्धा याविषयीची तक्रार पोलिसांत दाखल करण्यात आली होती. रामदास तडस यांची जनमानसात सहज उपलब्ध होणारा खासदार म्हणून ख्याती आहे आणि त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे. त्यांच्या मतदारसंघातील मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होवून दिशाभूल करण्याचा विरोधकांचा हा केविलवाणा प्रकार आहे. याविरोधात त्यांनी रामनगर पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्या अँडमीनसह संबधितावर भादंवि ५०१ नुसार गुन्हा दाखल केला. याप्रकरणी अधिक तपास रामनगर पोलीस करीत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे