बार्शीत पहिल्या डिजिटल मिडिया संमेलनाचे आयोजन : खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते लोगोचे अनावरण
बार्शी | व्हॉईस ऑफ मिडिया या देशपातळीवरील संघटनेच्या बार्शी शाखेच्या वतीने पहिल्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. दि २३ जुलै रोजी वीरशैव लिंगायत बोर्डिंग येथे सकाळी १० ते सायंकाळी ७ पर्यंत हे संमेलन होत असून, यात पत्रकारांसाठी विविध विषय तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. या संमेलनाच्या लोगोचे अनावरण धाराशिव मतदारसंघाचे लोकप्रीय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी करण्यात आले.
संमेलनाच्या पहिल्या सत्रात न्यूज 18 लोकमतचे अँकर, व्हॉईस ऑफ मिडीया टिव्ही विंगचे राज्याध्यक्ष विलास बडे यांचे डिजीटल पत्रकारिता या विषयावर मार्गदर्शन, एबीपी माझाचे िडजीटल संपादक मेघराज पाटील यांचे िडजीटल मिडीया या विषयावर मार्गदर्शन तर दुसऱ्या सत्रात नागपूर येथील डिजीटल मिडीया विषयाचे अभ्यासक देवनाथ गंडाटे यांचे डिजीटल मिडीया आणि पत्रकारिता या विषयावर प्रशिक्षणपर मार्गदर्शन होत आहे. या संमेलनात सहभागी होण्यासाठी पत्रकारांना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही तसेच परगावहून आलेल्या पत्रकारांची नाश्ता व भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे, त्यासाठी ९६८९२६४४३६, ७०८३२७८५८४ या व्हॉटसअप क्रमांकावर अगोदरच लेखी कळविणे आवश्यक आहे.
या संमेलनाचे अध्यक्ष तथा व्हॉईस ऑफ मिडीया संघटनेचे संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष संदिप काळे, स्वागताध्यक्ष पुण्यश्लोक अिहल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागप्रमुख रविंद्र चिंचोलकर, प्रमुख पाहुणे धाराशिव मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राजेंद्र राउत, जिल्हा माहिती अधिकारी सुनिल सोनटक्के, तहसिलदार एफ एस शेख, उपविभागीय पोलिस अधिक्षक जालिंदर नालकुल, मुख्याधिकारी तथा प्रशासक बाळासाहेब चव्हाण, पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, पोलिस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या संमेलनासाठी व्हाईस ऑफ मिडीयाचे प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, डिजीटल विभागाचे राज्याध्यक्ष जयपाल गायकवाड, मराठवाडा विभागाचे अध्यक्ष विजय चोरडिया, लातूर जिल्हाध्यक्ष बालाजी फड, बीड जिल्हाध्यक्ष बालाजी मारगुडे, धाराशिव जिल्हाध्यक्ष ओंकार बनसाडे, राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले, संशोधक रेणुका फड, कळंब विभागाचे अध्यक्ष अमर चौडे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
संमेलन यशस्वीतेसाठी मार्गदर्शक व ज्येष्ठ संपादक संदीप मठपती, मल्लिकार्जून धारूरकर, संतोष सुर्यवंशी, बार्शी शाखेचे अध्यक्ष प्रदीप माळी, हर्षद लोहार, सागर गरड, शाम थोरात, विजय शिंगाडे, निलेश झिंगाडे, जमीर कुरेशी, ओंकार हिंगमिरे, मयूर थोरात, आस्लम काझी, प्रविण पावले, समाधान चव्हाण आदी परिश्रम घेत आहेत.
———-
डिजीटल मिडीयाच्या व्हॉईस ऑफ मिडीया या देशपातळीवरील संघटनेने बार्शीत पहिले डिजीटल मिडीया पत्रकार संमेलन आयोजित केले आहे. आपण सर्व पत्रकार बांधवांनी या संमेलनासाठी उपस्थित रहावे.
– आेमराजे निंबाळकर, खासदार, धाराशिव
———-
लोकशाहीतील चौथा खांब म्हणून सर्वसामान्यांची विश्वासार्हता संपादन केलेल्या पत्रकारांची आधुनिक जगतातील डिजीटल माध्यमांत समाविष्ठता झाली आहे. नागरिकांच्या अपेक्षेप्रमाणे सर्वात अगोदर माहिती पोहोचविणे आणि सत्य माहिती उपलब्ध करणाऱ्या डिजीटल माध्यमांतील पत्रकारांकडे मोठ्या अपेक्षा आहेत. स्पर्धेच्या युगात तळहातावररील मोबाईलचा योग्य वापर करुन ते हाताळण्याचे तंत्रज्ञान घेतांना काही आचारसंहिता देखिल असायला पािहजे याचे तज्ञांकडून मार्गदर्शन होण्यासाठी, नव्याने या क्षेत्रात येवू इच्छिणाऱ्यांना प्रशिक्षणासह योग्य माहिती उपलब्ध करण्याच्या हेतूने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे यशस्वी करण्याची जबाबदारी राज्यातील सर्वच पत्रकारांची आहे. आपण सहभाग नोंदवावा हिच अपेक्षा
– प्रदिप माळी, अध्यक्ष व्हॉईस ऑफ मिडीया, बार्शी शाखा
———-
छायाचित्र ओळी
व्हॉईस ऑफ मिडीयाच्या पहिल्या संमेलनाच्या लोगोचे अनावरण करतांना धाराशिवचे खासदार आेमराजे निंबाळकर, डावीकडून मल्लिकार्जुन धारुरकर, निलेश झिंगाडे, शाम थोरात, प्रदिप माळी, संदिप मठपती, विजय शिंगाडे, हर्षद लोहार, समाधान चव्हाण, भैय्या बाफणा आदी