Breaking
ब्रेकिंग

शेतशिवारातील मोटारपंप चोरणारी टोळी गजाआड, पाच जणांना अटक

2 5 4 4 4 7

सचिन धानकुटे

सेलू : – शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी वापरण्यात येणारे मोटारपंप चोरणारी टोळी गजाआड करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सेलू व वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या २४ तासाच्या आत पाच जणांना अटक करीत मोटारपंप चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. यामध्ये यश गजानन इंगोले (वय१९), अभिजित संजय बेदरकर (वय२२) दोन्ही रा. सोमनाथे ले-आऊट सिंदी मेघे व वंश राजेश राऊत (वय१९) रा. साईनगर वर्धा यांना सेलू पोलिसांनी तर शिवाशीष अशोक सराटे (वय२३) व सूरज सुरेश मुंडेकार (वय२१) दोन्ही रा. जावई नगर, वरुड अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावं आहेत.

      मिळालेल्या माहितीनुसार, मौजा सुकळी स्टेशन ते धपकी जाणाऱ्या रस्त्यावरील बोर नदीच्या पूलाशेजारी सेलू येथील सतिश दामोदर सोनटक्के व सुधीर सोनटक्के सह सुकळी येथील अतुल कराळे यांची शेती आहे. त्यांनी शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी पाण्यातील मोटारपंप लावले आहेत. सदर मोटारपंप बुधवार ता.१० रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास चोरट्यांनी चोरुन नेले होते. सदर बाब शेतकऱ्यांच्या लक्षात येताच याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करीत तपासाला गती दिली. दरम्यान वर्ध्याच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राजेश तीवसकर, हमीद शेख, श्रीकांत खडसे यांनी वरुडच्या जावई नगरातील शिवाशीष आणि सुरजला ताब्यात घेत त्यांचा समाचार घेतला. ह्याचवेळी सेलूच्या स्थानिक गुन्हे शाखेचे गणेश राऊत आणि ज्ञानदेव वनवे यांनी वर्ध्यातील यश, अभिजित आणि वंशला ताब्यात घेतले. सदर पाचही जणांनी संगनमताने मोटारपंप चोरी केल्याची कबुली यावेळी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून तीन मोटारसायकल आणि मोटारपंप असा एकूण २ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल जप्त करीत अवघ्या २४ तासाच्या आत गुन्हा उघडकीस आणला.

     ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड व सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या निर्देशानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार गणेश राऊत व ज्ञानदेव वनवे करीत आहे.

3.2/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 4 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे