गुन्हेगारी

विहिरीत उडी घेऊन दोघांची आत्महत्या

मसाळा येथील घटना : मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळले

वर्धा : एकामेकांच्या हाताला हात बांधून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी अडीच वाजता मसाळा (जुने) येथे उघडकीस आली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून सेवाग्राम पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीकरिता रुग्णालयात दाखल केले आहे.
मंगला राजेंद्र उमाटे रा. मसाळा आणि महेश बारई रा. तळेगाव टालाटुले हल्ली मुक्काम समतानगर वरुड अशी आत्महत्या केलेल्या व्यक्तींची नावे आहेत. दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांचे परिचित असून महेश बारई हा नेहमीच मंगला उमाटे यांच्या शेतात काम करण्याकरिता यायचा.
मंगळवारी सकाळी हे दोघेही शेतात गेले होते. त्यानंतर घरी उशिरापर्यंत न आल्याने त्यांची शोधाशोध सुरु केली होती, यात उमाटे यांच्या शेतातील विहिरीजवळ दोघांच्याही चपला दिसून आल्या होत्या. याबाबत सेवाग्राम पोलीस ठाण्यात कालच तक्रार दाखल केली होती.
आज दुपारी दोघांचेही मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळल्याने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी सेवाग्राम पोलीस अधिक तपास करीत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
भाषा बदला»
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे