पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे यांची अल्लीपूर येथे बदली : सिंदीच्या ठाणेदार वंदना सोनुने
सचिन धानकुटे
सेलू : – येथील पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे यांची प्रशासकीय कारणास्तव नुकतीच अल्लीपूर येथे बदली करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांच्या नुकत्याच प्रशासकीय कारणास्तव बदल्या करण्यात आल्या आहेत. यात सेलू पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे यांची अल्लीपूर पोलीस ठाण्यात तर अल्लीपूर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक स्वपनिल भोजगुडे यांची सेलू पोलीस ठाण्यात नेमणूक करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक सुरेश कोहळे यांच्या बदलीला मात्र प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आली. यासोबतच आर्वी येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक वंदना सोनुने यांना सिंदी ठाणेदार म्हणून बढती मिळाली आहे. सिंदी येथील पोलीस उपनिरीक्षक जयंत नगराळे यांची आर्वी येथे तर वडनेर येथील पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितरे यांची सिंदी येथे नेमणूक करण्यात आली. दहेगांव येथील पोलीस निरीक्षक योगेश कामाले यांच्या बदलीला मात्र प्रशासकीय कारणास्तव स्थगिती देण्यात आली.