जय भवानी, जय शिवाजीच्या जयघोषाने दुमदुमली टाकळी नगरी ; शिवजयंती उत्साहात साजरी
सचिन धानकुटे
सेलू :- तालुक्यातील टाकळी (झडशी) येथे शिवजयंतीच्या पर्वावर विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन करीत उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात टाकळी नगरी दुमदुमली होती.
सदर कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आले होते. याप्रसंगी ग्राम स्वच्छता तसेच विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फत नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. दुपारच्या सत्रात शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषाने टाकळी नगरी दुमदुमून गेली होती. सदर मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर प्रबोधनकार विष्णुजी ब्राम्हणवाडे यांचा समाज प्रबोधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गावामध्ये संत जगनाडे महाराज वाचनालयाची मुहूर्तमेढ रोवत रितसर उद्घाटन देखील करण्यात आले.
याप्रसंगी राहुल दुधकोर, लोकेश सावरकर, आकाश गेडाम, कृष्णकांत नान्हे, समीर गेडाम, भास्कर ठोंबरे, करण धनफुले, चेतन सोनटक्के, महेश सावरकर, चेतन नंदुरकर, समीर सोनटक्के, प्रज्वल लाकडे, यश गोहणे, यश नांदे, आकाश मेश्राम, आकाश कुळवाडे, भाजयुमोचे तालुकाध्यक्ष संकेत बारई, पोलीस पाटील मनिषा शेलोटे, सरपंच स्मिता पारटकर, अश्विनी शिवरकर, बंडु म्हैसकर, ज्योती सावरकर, भूषण पारटकर, झाडे गुरुजी सह महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.