Breaking
ब्रेकिंग

फ्रेंड रिक्वेस्ट, चॅटींग अन् अश्लील व्हिडीओ ; आलोडीच्या इसमास आठवडाभरात लाखांच्यावर चुना

2 5 4 4 4 7

सचिन धानकुटे

वर्धा : – ऑनलाइन फसवणूकीच्या घटनेत एका महिलेने अश्लील व्हिडीओ सार्वजनिक करण्याचा धाक दाखवत इसमास लाखांच्यावर गंडा घातल्याची तक्रार सायबर पोलिसांत दाखल करण्यात आली. यात आठवडाभरात सहा वेगवेगळ्या फोन क्रमांकावर जवळपास १ लाख ९ हजार ७५० रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

आलोडी येथील ४७ वर्षीय इसमास एका महिलेच्या नावाने फेसबुक अकाऊंटवरुन फ्रेंड रिक्वेस्ट आली. ता.२९ जुलै ते ६ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीत सदर रिक्वेस्ट आली आणि ती इसमाने स्विकारली. यानंतर फोन क्रमांकाचे आदानप्रदान करीत दोघांमध्येही चॅटींग सुरू झाले. दरम्यान आरोपी महिलेने नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल करीत इसमालाही वस्त्रहीन होण्यास बाध्य केले. दरम्यान ता.३० जुलै रोजी सदर महिलेने त्या इसमास तुझा अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आला असून तो व्हिडीओ इसमास पाठवला. व्हिडीओ डिलीट करायचा असेल तर महिलेच्या फोनवर ३ हजार रुपये टाकण्यास सांगितले. यावेळी इसमाने महिलेस ३ हजार रुपये ऑनलाइन पाठवताच तो व्हिडीओ तात्पुरता डिलीटही करण्यात आला.
दरम्यान ता.६ ऑगस्ट रोजी सदर इसमास पुन्हा यासंदर्भात फोन आला आणि दिल्ली क्राईम ब्रँचमधून बोलत असल्याचे सांगून तो अश्लील व्हिडीओ युट्युबवर अपलोड झाला असून काढून टाकण्यासाठी अतिरिक्त पैशाची मागणी करण्यात आली. यावेळी वेगवेगळ्या फोन क्रमांकावर २१५००, ४२२५० आणि २३००० हजार अशाप्रकारे रक्कम उकळण्यात आली. दरम्यान इसमास आपली ऑनलाइन फसवणूक झाल्याचे लक्षात येताच यासंदर्भात सायबर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी तत्काळ गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
ऑनलाइन फसवणूकीच्या घटना सातत्याने घडत असून नागरिक मात्र त्यापासून कोणत्याही प्रकारचा बोध घेण्याचा प्रयत्न करताना दिसून येत नाही. ऑनलाइन फसवणूकीच्या एकसारख्या प्रकाराला वारंवार बळी पडतात. अशाप्रकारे फसवणूक झाल्यानंतर बरेचजण बदनामी आणि भितीपोटी तक्रार सुद्धा दाखल करीत नाही, त्यामुळेच अशाप्रकारच्या घटना आणि फसवणूकीच्या प्रकारात सातत्याने वाढ होत आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 5 4 4 4 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे