Breaking
ब्रेकिंग

राष्ट्रवादी सरकारमध्ये शामिल झाली आणि डाॅ. अविनाश अणे यांचे नाव असलेला मॅसेज व्हायरल झाला

2 0 8 9 8 8

*सध्याच्या महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर माझं वैयक्तिक मत आणि शक्यता*

*1. एक दोन दिवसात विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर सक्रीय होवून शिंदे आणि इतर आमदाराच्या अपात्रेवर निर्णय घेईल*

*2. आधी सांगितल्याप्रमाणे मेरिट बेसिसवर निर्णय घेऊन शिंदे सहीत सोळा आमदार अपात्र घोषित होईल. म्हणजेच शिंदे आणि इतरांना काय ती झाडी, काय ते डोंगार बघायला गोवाहाटीला पाठवतील सुरत मार्गे व तिथुन सरळच घरी*

*3. त्यानंतर मंत्रीमंडळ बरखास्त केल्या जाईल व पुन्हा शपथविधी होईल. मात्र त्यात अजित पवार मुख्यमंत्रीपदावर आरूढ होईल आणि फडणवीस उपमुख्यमंत्री*

*4. मध्यंतरीच्या काळात इडी, सिबिआय ने गोळा केलेल्या जलसंधारण विभागतील आणि इतर घोटाळ्यातील फाईल्स अजित पवारांना सुपूर्द केल्या जातील आणी राष्ट्रवादीच्या सगळ्याच घोटाळ्यात अडकलेल्या मंत्री/आमदार यांना क्लिन चिट दिल्या जाईल*

*5. हसन मुश्रीफ व इतरांवर सुरू असलेली कार्यवाही तातडीने बंद करण्यात येईल*

*6. नवाब मलिकांना लगेचच बेल मिळेल आणि ते बाहेर येतील*

*7. मुंबई स्तिथ ईडी/सिबिआय च्या अधिकाऱ्यांना विश्रांती घ्यायला लावून ऑफिसला काही दिवसांसाठी कुलूप लावण्यात येईल*

*8. किरीट सोम्यया, सुक्ष्म नारायण राणे आणि त्याची पिलावळ अजित पवार आणि राष्ट्रवादीचे इतर आमदार किती चांगले आणि स्वच्छ आहेत हे रोज टिव्हीवर येवून आपल्याला पटवून देण्याचा आटोकाट प्रयत्न करतील व त्यांच्या सांगितल्याप्रमाणे भक्त मंडळात आनंदाचे उधाण येवून अजित पवार आणि इतरांचे गुणगान गायला लागतील*

*9. आजपासून अजित पवार आणि इतर विश्वगुरू मोदी किती महान आहेत हे सांगायला सुरुवात करतील, व भक्त मंडळी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या नावाने घसा कोरडा होईपर्यंत ओरडत राहतील*

*10. यानंतर नागरिकशास्त्र विषयाचं नवीन नामकरण करून आता अनैतिक जुगाडशास्त्र शिकवल्या जाईल*

*या सर्वच हलकट नेत्याच्या स्वार्थी राजकारणातून गरीब, मध्यमवर्गीय आणि सामान्य नागरिकाला काय मिळालं तर सर्वसामान्य लोकं त्यात कोणाचे नातेवाईक पण असतील हे असेच अपघातात बळी पडतील आणि मृत झालेल्या व्यक्तीला पाच/सात लाख रूपये मदत जाहीर करून हे सत्तेचा असुरी आनंद उपभोगत बसतील. यावरून एकच दिसतंय की या नेत्यांना तुमच्या आमच्या दुखाचं काहीच सोयरसुतक नाही. एकवेळ निवडून आलेला आमदार करोडो रूपयांची कमाई करून आपल्या सात पिढ्यांचा उद्धार करून जातो. मंत्रीपदावर असलेला संजय राठोड सारखा माणूस एका तरुण मुलीवंर अत्याचार करून तिला आत्महत्या करायला भाग पाडतो व पुन्हा ताठ मानेने पदावर येवून समाजात वावरतो. बटीक आणि रखेल झालेली न्यायव्यवस्था लोकशाहीचे चिथडे होतांना उघड्या डोळ्याने बघत राहते आणि आम्ही मात्र भारतीय लोकशाही, संविधान जगात सर्वश्रेष्ठ असल्याच्या अविर्भावात असल्या नालायक, पढयंत्री नेत्यांवर विश्वास ठेवून जगत राहतो. पण त्यावर बोलायला तयार नाही. हिच तर खरी शोकांतिका आहे भारतीय समाज मनाची आणि लोकांच्या धार्मिक वेडेपणाची*

*डाॅ. अविनाश अणे*

☹️🤔☹️🤔☹️🤔☹️🤔

1/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 8 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे