आर्वीच्या आठवडी बाजारात आग ; ३ दुकानं जुळून खाक : लाखोंचे नुकसान
किशोर कारंजेकर
आर्वी :- आज रात्री 2.20 च्या सुमारास आठवडी बाजारातील अशोक जिरापुरे यांच्या भंगाराच्या दुकानाला आग लागली व आग पसरुन बाजूच्या दशरथ जाधव यांचे दूकान, आर्वी गुडस गॅरेज तसेच त्याला लागत खानावळ आग पसरली. आगीमुळे मोठ्या नुकसान झाले आहे असा अंदाज आहे. अग्नीशमन वाहनाद्वारे सतत पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचे काम केले.
संदेश प्राप्त होताच रात्री 2.30 वा अग्नीशमन वाहन आपल्या चमुसह घटनास्थळी पोहोचून लागलेली आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू केले. घटनास्थळची भयावह परीस्थिती पाहता तसेच आजूबाजूच्या तीन ते चार दुकानाला आग वाढत असल्याचे निदर्शनास आल्याचे दिसतात अरुण पंड्या यांनी पुलगाव व आष्टी येथील अग्नीशमन वाहनाला तात्काळ पाचारण करण्यात आले.
घटनेच्या वेळी नरेश आखरे, वाहनचालक बबन बावनकर, निलेश गिरडकर, अरुण पंड्या, शिवाजी चीमोटे फायरमन सह नगर परिषदेचे रणजीत पवार उपमुख्याधिकारी, साकेत राऊत कनिष्ठ अभियंता, सुरेंद्र चोचमकर पाणी पुरवठा अभियंता, तसेच सामाजिक कार्यकर्ता गौरव जाजू उपस्थित होते. तसेच नगर पंचायत आष्टी येथील वाहना वरील नरेंद्र कदम व त्यांचा चमू , त्याच प्रमाणे पुलगाव नगर परिषदेचे निखिल आटे व त्यांचा चमू हे उपस्थित होते.
सकाळी 8.00 वा च्या सुमारास पुलगाव तसेच आष्टी येथील अग्नीशमन वाहनाला चमुसह परत पाठविण्यात आले असून आर्वी येथील अग्नीशमन वाहन घटनास्थळी हजर असून संपूर्ण घटना आटोक्यात आणण्याचे काम सुरू आहे.