Breaking
ब्रेकिंग

भरधाव मोटारसायकलची नातवासह रस्ता पार करणाऱ्या इसमास धडक ; दोघे गंभीर जखमी

1 9 7 0 5 9

सचिन धानकुटे

सेलू : – नातवासह रस्ता पार करणाऱ्या इसमास भरधाव मोटारसायकलने जबर धडक दिल्याने दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज रात्री शहरातील काँग्रेस कमेटीसमोर घडली. अशोक नारायण वाघमारे(वय६७) व अजय राजू कुबडे(वय२१) दोन्ही रा. सेलू अशी सदर अपघातातील जखमींची नावे आहेत.

      मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील अशोक वाघमारे हे आपल्या नातवाला शिकवणी वर्गातून परत घराकडे घेऊन निघाले होते. दरम्यान रस्ता पार करीत असताना त्यांना काँग्रेस कमेटीसमोर विना क्रमांकाच्या भरधाव मोटारसायकलने जबर धडक दिली. यात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली तर मठ्ठा मारुन असलेल्या मोटारसायकल स्वाराच्या डोळ्याजवळ जखम झाली. यावेळी अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात रक्ताचा सडा पसरला होता तसेच बघ्यांची देखील गर्दी झाली होती. अपघातानंतर दोघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यातील अशोक वाघमारे यांना सावंगी(मेघे) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर अजय कुबडे यास ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर सुट्टी देण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे