Breaking
ब्रेकिंग

शेतकरी “एमएन” बँक अपहार..! अल्टीमेटम संपताच आक्रोशीत खातेदारांचा अध्यक्षांसह भावाला बेदम चोप

2 0 8 9 8 0

सचिन धानकुटे

सेलू : – शेतकरी महिला निधी लिमिटेडचे अध्यक्ष शरद कांबळे यांनी आपल्या भावाच्या नादी लागून बँकेत मोठा अपहार केला. त्यामुळे अनेक खातेदारांचे पैसे बँकेत अडकले आहेत. या प्रकरणाचा वाद सध्या पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रलंबित आहे. याठिकाणी झालेल्या तडजोडीअंती कमीतकमी ३० आणि जास्तीतजास्त ४५ दिवसांत खातेदारांचे पैसे देण्याचे लेखी आश्वासन एका मुंद्रांकावर अध्यक्ष शरद कांबळे यांनी खातेदारांना दिलं होतं. तो अल्टीमेटम शनिवार ता.२५ रोजी संपला. त्यामुळे संतापलेल्या खातेदारांनी अखेर अध्यक्षाला त्यांच्या घरी गाठले. यावेळी वळवळ करणाऱ्या अध्यक्ष आणि त्याच्या रोशन कांबळे नामक भावाला खातेदारांनी चांगलेच बदडले. 

      मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या अध्यक्ष शरद कांबळे यांनी आपल्या भावाच्या नादी लागून बँकेच्या सुरक्षा ठेवीचा अपहार केला. यात नियम पायदळी तुडवून बँकेचा पैसा आपल्या मालकीच्या वंडरलॅड वॉटरपार्कमध्ये गुंतवणूक केला. त्यामुळे बँक चांगलीच डबघाईस आली आणि खातेदार, अभिकर्ता व व्यवस्थापक देखील अडचणीत आले. दोन्ही भावांनी खातेदारांचा पैसा म्हणजे आपल्या “बा”ची खाजगी मालमत्ता समजून तीचा अपहार केला. पैसे मागणाऱ्या खातेदार आणि अभिकर्त्यांशी अध्यक्ष शरद कांबळेचा भाऊ रोशन कांबळे हा हातघाईवर उतरला. तुम्ही पैसे बँकेत जमा केले, त्यामुळे आमच्या घरी न येता याकरिता बँकेतच जा, असा फुकटचे सल्ले देत गेला. परंतु अध्यक्ष शरद कांबळे यांनी दिलेल्या अल्टीमेटमवर विश्वास ठेवून खातेदार आणि अभिकर्ता मंडळी शांत बसली होती. शेवटी शनिवारी हा अल्टीमेटम संपला आणि खातेदार चांगलेच आक्रमक झाले. 

    अध्यक्षांचा अल्टीमेटम संपल्याने शनिवारी सगळे खातेदार, अभिकर्ता आणि व्यवस्थापक पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. त्याठिकाणी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उपस्थित नव्हते, म्हणून सगळे शरद कांबळे यांच्या घरी धडकले. यावेळी झालेल्या खडाजंगीत अध्यक्ष आणि त्यांचा भाऊ लयचं वळवळ करीत होता. दरम्यान एका खातेदारांस “उल्टा चोर कोतवाल को डाटे” ह्याचा प्रत्यय आला. मग काय तर रोशन कांबळेच्या पेकाटात आणि अध्यक्षांच्या कानफटात असा काही आवाज घुमू लागला, ज्याच्या हाती जो लागला त्यांनी यावेळी आपली भडास काढून टाकली. शेवटी प्रकरण रामनगर पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्यानंतर शहर पोलीस ठाण्यात. याठिकाणी परत एकदा अध्यक्ष शरद कांबळे यांना २० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे जास्त वळवळ केली तर आपलं जनता काय करु शकते, ह्याचा प्रत्यय नक्कीच दोघांनाही एव्हाना आला असेल. आता या विस दिवसांनंतर पुन्हा काय घडते, याकडे सगळ्या खातेदार, अभिकर्ता आणि व्यवस्थापकांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

 

रोशन कांबळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी

   राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नेत्याने जिल्ह्यातील एक सहकारी बँक आधीच खावून खोबरं केली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा पदाधिकारी असलेल्या रोशन कांबळे नामक भामट्याने शेतकरी महिला निधी लिमिटेडचा अध्यक्ष असलेल्या आपल्या भावाला नादी लावले. बँकेच्या सुरक्षा ठेवीचा उपयोग खाजगी कामासाठी केला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या “त्या” नेत्याने तर दोन्ही भावांना बँक बुडविण्याचा कानमंत्र दिला नसावा ना.. अशी कुजबूज सध्या खातेदारांत सुरू आहे.

3.5/5 - (4 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 8 9 8 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे