सचिन धानकुटे उत्कृष्ट तालुका अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित
सेलू : – नाशिक येथील व्हॉईस ऑफ मीडियाच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशनात सेलू येथील व्हॉईस ऑफ मीडियाचे सचिन धानकुटे यांना विदर्भातील उत्कृष्ट तालुका अध्यक्ष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
नाशिक येथे शनिवार ता.२५ रोजी व्हॉईस ऑफ मीडियाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अधिवेशन नुकतेच पार पडले. याप्रसंगी विदर्भातील विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, वाशिमचे जिल्हाध्यक्ष भागवत मापारी, चंद्रपूरचे पालक सचिव प्रा. संजय पडोळे, गडचिरोलीचे शहराध्यक्ष नासिर हाशमी यांच्यासह व्हॉईस ऑफ मीडियाचे सेलू तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे यांना पुरस्कार प्रदान करीत गौरविण्यात आले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार तथा राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे, व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ बि जी शेखर पाटील, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, गुजरातचे प्रदेशाध्यक्ष जिग्नेश जोशी, प्रदेश कार्याध्यक्ष योगेंद्र दोरकर, अजित कुंकलोळ, उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष दिंगांबर महाले, महिला प्रदेश संघटक यास्मीन शेख, उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती नदवी प्रामुख्याने उपस्थित होते.
सचिन धानकुटे यांनी आपल्या यशाचे श्रेय राज्य कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कथले, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटीक, विभागीय उपाध्यक्ष नरेंद्र देशमुख, जिल्हाध्यक्ष किशोर कारंजेकर, सचिव एकनाथ चौधरी यांना दिले. नाशिक येथील अधिवेशनात सन्मानित करण्यात आल्याबद्दल सचिन धानकुटे यांचे व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्यांकडून अभिनंदन करण्यात आले.