Breaking
ब्रेकिंग

वर्धा विधानसभा मतदारसंघात तुतारी पाठोपाठ घड्याळाचाही गजर..! राष्ट्रवादीत घडामोडींना वेग, यंदाचा आमदार सेलूचाच : चर्चांना उधाण

2 4 7 1 7 9

किशोर कारंजेकर

वर्धा : – बारामतीच्या मातीतील राजकारण कधीकाळी वर्ध्यातही पोहचेल असे मत एकाही राजकीय विश्लेषकाने अथवा जाणकाराने वर्तविल्याचे ऐकिवात नाही. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मात्र ते अधोरेखित झाले. अशाचप्रकारे आता राष्ट्रवादी काँग्रेसने म्हणजेच अजित पवार यांच्या गटाने वर्धा-सेलू विधानसभा मतदारसंघावर घड्याळाचा गजर करीत निवडणूकीची तयारी देखील सुरू केल्याचं दिसते. दस्तुरखुद्द अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनीच तशा आशयाच्या सुचना दिल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य संघटन समन्वयक राणा रणनवरे यांनी आज RNN सोबत बोलतांना सांगितले.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राणा रणनवरे यांनी याआधीही भाजपात असताना आमदारकीची तिकीट न मिळाल्याने अपक्ष उमेदवार म्हणून वर्धा विधानसभा निवडणुक लढविली आहे. वर्धा विधानसभा मतदारसंघातील येळाकेळी आणि हिंगणी अशा दोन जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यांनी लागोपाठ विजयी होण्याचा पराक्रम केला आहे. काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय जयस्वाल यांना राणा रणनवरे यांनी सलग दोनदा धूळ चारली. त्याहीपेक्षा मोठा चमत्कार म्हणजे आपल्या अर्धांगिनीस त्यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी विराजमान करण्याचा पराक्रम देखील त्यांच्या नावे नोंद आहे. वर्धा मतदारसंघाचा वरील सगळा इतिहास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना चांगलाच माहिती आहे, आणि त्यामुळेच अजितदादा वर्धा विधानसभा मतदारसंघात घड्याळ चिन्हासाठी आग्रही असल्याचे सांगितले जाते. यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर मोठ्या घडामोडी देखील घडत असून वर्ध्यात तूतारीच्या पाठोपाठ घड्याळाचा गजर होणार का, हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.

3.7/5 - (3 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 4 7 1 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे