Breaking
ब्रेकिंग

शेतकरी “एमएन” बँक अपहार..! : आर्थिक गुन्हे शाखा ऍक्शन मोडवर, बँक व्यवहारांच्या “कुंडली”ची पडताळणी

2 6 9 1 9 9

सचिन धानकुटे

सेलू : – शेतकरी महिला निधी लिमिटेड बँकेच्या अपहार प्रकरणात सध्या आर्थिक गुन्हे शाखा ऍक्शन मोडवर आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. संबंधित पोलिस अधिकाऱ्यांनी बँक व्यवहारांच्या कुंडलीची पडताळणी सुरू केल्याचं काल सोमवारी पोलिस अधीक्षक कार्यालयात घडलेल्या घडामोडींवरुन दिसून येते.

      जिल्ह्यातील शेतकरी महिला निधी लिमिटेड बँक ही अध्यक्ष शरद कांबळे आणि त्यांचा आरके नामक भावाने केलेल्या अपहारामुळे चांगलीच डबघाईला आली. या दोन्ही बिन अकलीच्या कांद्यानी बँकेच्या सुरक्षा ठेवींचा उपयोग आपल्या वंडरलॅड वॉटरपार्क मधल्या अँडव्हेंचर पार्कसाठीच्या खेळण्यासाठी केला. बँकेची सुरक्षा ठेव म्हणजे आपल्या “बा”ची खाजगी मालमत्ता समजून तीचा अपहार करण्यात आलायं. दरम्यान भूसंपादन घोटाळा उघडकीस आला अन् बँक चौकशीच्या फेऱ्यात अडकली. ही बाब उजेडात येताच पैशासाठी खातेदारांची बँकाच्या शाखांत एकच झुंबड उडाली.

    दरम्यान ता.८ एप्रिल रोजी जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील शाखेत अध्यक्ष शरद कांबळेचं आगमन होताच त्याला खातेदारांच्या रोषाचा चांगलाच सामना करावा लागला. प्रकरण चांगलेच हातघाईवर आले, अध्यक्षांच्या चारचाकी वाहनावर खातेदारांनी कब्जा केला, एकाने तर अध्यक्षाला चांगलेच गचाटगुचाट केले अन् शेवटी त्याची पोलिस ठाण्यापर्यंत पायदळ वरात काढण्यात आली. यावेळी आर्वी येथील शाखेचे अभिकर्ता देखील त्याला आमच्या स्वाधीन करा असे आवाहन करीत होते. त्यावेळी यदाकदाचित अध्यक्ष त्यांच्या हाती जर सापडला असता तर त्यांनी देखील अध्यक्षांचा हनुमान करण्याची संधी दवडली नसती. शेवटी दहा तारखेला आर्वी शाखेत येण्याचं अभिवचन देत कारंजा पोलिस ठाण्यातून कशीबशी सुटका करून घेतली. असाच काहीसा किस्सा वर्धा येथील शाखेत देखील घडला, त्यावेळी देखील अध्यक्ष महोदय थोडक्यात बचावल्याचे सांगितले जाते.

      त्यानंतर ता.१० एप्रिल रोजी बँकांचे व्यवस्थापक, अभिकर्ता व खातेदार पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहोचले. पोलिसांनी तेथून अध्यक्ष कांबळेला हाजीर होण्याचा आदेश दिला. यावेळी झालेल्या तडजोडीअंती कमीतकमी ३० दिवस आणि जास्तीतजास्त ४५ दिवसांत खातेदारांचे पैसे देण्याचे लेखी आश्वासन अध्यक्ष कांबळे यांनी दिले. ही मुदत संपायला केवळ चार दिवस उरलेत, परंतु अद्यापही बँकाच्या शाखांत खडखडाट आहे. त्यामुळे काल सोमवारी संबंधितांना पोलिस अधीक्षक कार्यालयात हाजीर होण्याचा आदेश झाला. यावेळी पोलिसांनी बँकाच्या व्यवहारांच्या कुंडलीची मागणी केली असून पडताळणी सुरू केल्याचं कळते. एकूणच आता आर्थिक गुन्हे शाखा शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या संदर्भात ऍक्शन मोडवर आली असून खातेदारांचे २५ मे या दिवसांकडे लक्ष केंद्रित झाले आहे.

1/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 9 1 9 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे