Breaking
ब्रेकिंग

उपअधिक्षक “सुखदेव”च्या खोड्यांमुळे अनेकांची दाणादाण..! लक्ष्मी दर्शनाशिवाय कामचं होत नसल्याने पक्षकारांत संतापाची लाट : सेलूच्या भूमी अभिलेख कार्यालयातील प्रकार

1 9 5 5 6 1

सचिन धानकुटे

सेलू : – येथील भूमी अभिलेख कार्यालयात लक्ष्मीदर्शना शिवाय कोणत्याही प्रकारचे कामचं होत नसल्याने पक्षकारांत चांगलीच संतापाची लाट उसळली आहे. या कार्यालयातील “सुखदेव खोंडे” नामक अधिकाऱ्याच्या विनाकारण “त्रुट्या” काढून “खुट्या” टाकण्याच्या वृत्तीमुळे बऱ्याच पक्षकारांची दाणादाण उडाली असून याकडे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

      याआधीही या कार्यालयात असाच काहीसा प्रकार घडल्यानंतर भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने “त्या” सुखदेवचा त्यांच्याच कार्यालयात चांगलाच खरपूस समाचार घेतला होता. सदर प्रकरण कानपट शेकण्यापासून तर गाढवावर धिंड काढण्यापर्यंत येवून पोहचले होते. यावेळी “त्या” महामूर्ख अधिकारी सुखदेवला धरणीमाय जागा उरली नव्हती. शेवटी “त्या” अधिकारी पदासाठी लायक नसलेल्या सुखदेवने आपली चूक झाल्याचे मान्य करीत माफी मागितली आणि त्या प्रकरणावर पडदा पडला. याकरिता आमदार डॉ पंकज भोयर यांनी देखील सुखदेवला धारेवर धरत चांगलेच गरम केले होते हे विशेष..

      यानंतरही या अधिकाऱ्याने त्या प्रकरणापासून काडीचाही बोध घेतला नसून सरकारी कार्यालय म्हणजे आपल्या “बा”ची खाजगी मालमत्ता असाच काहीसा समज करून घेतला आहे. येथे अनेक पक्षकारांच्या कामात वारंवार त्रुट्या काढल्या जातात. त्या त्रुटींची पूर्तता केल्यानंतरही परत तीच त्रुटी काढून खूटी टाकण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र एखादा शेरास सव्वाशेर भेटला अन् त्याने नियम व कायद्याच्या चौकटीची आठवण करून दिली की मग त्याचे काम झालेचं म्हणून समजायला हरकत नाही. परंतु सर्वसाधारण पक्षकारांचे काय, ते बिचारे वारंवार या कार्यालयात चकरा मारतात, दिवसभर ताटकळत बसतात. त्यामुळे अशा या कामचुकार आणि पैशासाठी हपापलेल्या निष्क्रिय अधिकाऱ्याच्या कारभाराकडे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी लक्ष देतील का हाच खरा प्रश्न आहे.

 

“मोजणीसाठीही कर्मचारी फाडतात तोंड”

   सदर कार्यालया अंतर्गत शेतजमिनीचे मोजमाप केल्या जाते. यासाठी रितसर नोंदणी केल्यानंतर शासनाची चालान भरल्या जाते. परंतु त्यानंतरही शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मोजण्यासाठी बांधावर गेलेले येथील कर्मचारी त्या शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करतात. पदरात काही पडले नाही तर प्रसंगी अडवणूक देखील करतात. त्यामुळे या तोंड फाडणाऱ्या कर्मचाऱ्यांचा देखील तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

 

“अधिकाऱ्याचे ऑनलाईन सेंटरशी साटेलोटे”

     येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काही निवडक अशा ऑनलाईन सेंटर धारकांशी साटेलोटे असून त्यांच्या माध्यमातून गेलेली कामेचं येथे विनाअडथळा पार पडतात. इतर कामात मात्र विनाकारण वारंवार त्रुट्या काढल्या जातात. त्याची पूर्तता केल्यानंतरही परत त्रुटी काढल्या जाते. त्यामुळे पक्षकार चांगलेच हातघाईवर आल्याचे चित्र असून येत्या काळात एखाद्याचा येथे “हनुमान” होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 5 5 6 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे