वर्धेकरांनो सावधान : जिल्ह्यात पावसाचा हाहाकार : आधी माहिती जाणून घ्या नंतरच घराबाहेर निघा
किशोर कारंजेकर
वर्धा : जिल्ह्यात मागील 17 तासांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे रौद्ररूप पाहता जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी आज ता. 27 रोजी सुटी घोषित केली.
सर्व मुख्याध्यापक, सर्व माध्यमाच्या सर्व व्यवस्थापनाच्या, प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद असणार आहे.
हिंगणघाट तालुक्यातील कुंभी येथे 10 ते 15 घरात नाल्याचे पाणी शिरले असून लोकांना प्रशासनाच्या वतीने सुरक्षितपणे शाळेत स्थलांतरीत केले जात आहे. देवळी तालुक्यातील सरुळ येथे यशोदा नदीच्या पुलावरून पाणी असल्यामुळे वर्धा राळेगाव मार्ग बंद आहे.
जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांना आज सुट्टी घोषित करण्यात आलेली आहे. देवळी तालुक्यातील आंजी ते पिंपळगाव मार्गावरील पुलावरून पाणी वाहत आहे, आंजी ते अंदोरी मार्गावरील पुलावरून देखील पाणी वाहत आहे तसेच गंगापूर पुलावरून पाणी वाहत आहे. त्यापैकी गंगापूर गावाचा संपर्क तुटला आहे व इतर गावांना पर्यायी मार्ग आहे. समुद्रपूर तालुक्यातील वासी जवळील पुलावरून पाणी असल्याने नंदोरी वासी रस्ता सद्या बंद आहे. हिंगणघाट शहरात महाकाली नगरी मध्ये काही ठिकाणी पाणी घुसले आहे. देवळी तालुक्यातील बोरगाव ते अलोडा मार्ग बंद झाला आहे.
हिंगणघाट तालुका चानकी ते भगवा रोड बंद झाला आहे. हिंगणघाट तालुका चिंचोली ते हिंगणघाट रस्ता बंद. समुद्रपूर तालुका वाघाडी नाला भरून वाहत असल्याने समुद्रपुर- वर्धा मार्ग (शेडगाव मार्गे) बंद झाला आहे. याच तालुक्यातील भोसा – सिंदी रेल्वे मार्ग बंद आहे. सेलू तालुक्यातील सिंदी-पिंपरा-हेलोडी रस्त्यावरील नाल्याला पूर आल्याने पिंपरा व हेलोडी येथे वाहतुकीसाठी असलेला पर्यायी रस्ता बंद झालेला आहे.
सेलू तालुका सिंदी रेल्वे ते दिग्रज रस्ता, सिंदी रेल्वे ते पळसगाव बाई रस्ता, पहेलानपुर ते दहेगाव स्टे रस्ता, आलगाव ते शिवनगाव रस्ता तसेच परसोडी ते भानसोली रस्ता नाल्याच्या वरुन पाणी वाहत असल्याने तात्पुरता बंद झालेला आहे. सेलू तालुक्यातील खडका येथे बोर नदीच्या पुलावरुन पाणी वाहत असल्याने रस्ता बंद आहे. सेलू तालुक्यातील सिंदी रेल्वे ते दिग्रज रस्ता, सिंदी रेल्वे ते पळसगाव बाई रस्ता, पहेलानपुर ते दहेगाव स्टे रस्ता, आलगाव ते शिवनगाव रस्ता तसेच परसोडी ते भानसोली रस्ता नाल्याच्या वरुन पाणी वाहत असल्याने तात्पुरता बंद झालेला आहे. हिंगणघाट तालुक्यातील हिंगणघाट ते येणोरा, कुंभी ते सातेफळ रस्ता बंद झाला आहे. तसेच पोहणा ते वेणी नाल्याला पूर असल्याने मार्ग बंद झाला आहे. समुद्रपूर तालुक्यातील हमदापुर कांढळी रोडवरील उमरा पुलावरुन पुराचे पाणी वाहत असल्याने वाहतूक बंद. सेलू तालुक्यातील जयपूर ते चारमंडळ रस्तावरील बोर नदीच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे दोन्ही गावांंचा संपर्क तुटलेला आहे.