देवळीच्या ज्ञानभारती महाविद्यालयासह बि के समाजकार्य महाविद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात

आरएनएन न्युज नेटवर्क
देवळी : – येथील ज्ञानभारती महाविद्यालय, ज्ञानभारती ज्युनिअर कॉलेज आणि बि के समाजकार्य महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव डॉ प्रितम खडसे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य अभिषेक सावळकर तसेच समाजसेवक हरिभाऊजी ढोक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते तिरंगा फडकविण्यात आला. यावेळी आकाशात फडकणार्या ध्वजाकडे पाहत राष्ट्रगीतासह देशभक्तीपर समूहगीते महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सादर केली. यावेळी जेष्ठ समाजसेवक हरिभाऊजी ढोक यांनी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात स्वातंत्र्यवीरांच्या बलिदानाच्या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगितल्या, कठीण प्रयत्नाने मिळालेले स्वातंत्र्य टिकवणे तुमच्यासाठी कटीबद्ध असल्याचे ते शेवटी विद्यार्थ्यांना म्हणाले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा विणा निनावे यांनी केले. कार्यक्रमाला प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.