ब्रेकिंग
बारावीच्या विद्यार्थीनीची गळफास घेत आत्महत्या, धानोली (गावंडे) येथील घटना
2
6
7
9
3
2
सेलू : – बारावीला शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी दुपारच्या सुमारास तालुक्यातील धानोली (गावंडे) येथे घडली. अनुश्री सुनिल महाकाळकर असे मृतक विद्यार्थीनीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धानोली(गावंडे) येथील बाराव्या इयत्तेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनीने आज रविवारी दुपारच्या सुमारास आपल्या राहत्या घरीच गळफास घेतला. यावेळी अंगणात बसलेल्या काहींच्या सदर बाब लक्षात आली. त्यांनी तत्काळ तीला उपचारासाठी सेवाग्राम रुग्णालयात दाखल केले. यावेळी उपचारादरम्यान तीचा २ वाजून ५८ मिनीटांनी मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक निमगडे यांनी बोलताना दिली.
2
6
7
9
3
2