Breaking
ब्रेकिंग

बोरी कोकाटे येथील सरपंच विशाल भांगे अपात्र ; विभागीय आयुक्तांची कारवाई

2 0 8 9 8 8

सचिन धानकुटे

सेलू : – तालुक्यातील बोरी कोकाटे येथील सरपंच विशाल वसंतराव भांगे ह्यांच्यावर नुकतीच अपात्रतेची कारवाई करण्यात आली. त्यांनी सरपंच पदाची जबाबदारी पार पाडताना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९(१) नुसार विभागीय आयुक्तांनी ही कारवाई केली.

     विशाल भांगे यांनी आपल्या कार्यकाळात शौचालयाचे अपूर्ण बांधकाम केल्यानंतरही गावातील चार लाभार्थ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. यासोबतच त्यांच्या भावाने सार्वजनिक ठिकाणी अतिक्रमण करीत दुकान थाटल्याचे देखील चौकशी अहवालात पुढे आले. फेरकर आकारणीत प्रती घर १०० रुपये घेणे क्रमप्राप्त आहे, परंतु संबंधित कंत्राटदाराने यापेक्षा अधिक रक्कम वसूल केल्याचे दिसून आले. तसेच घरकुल मंजूर करतांना जागा नेमकी कोणाच्या मालकीची आहे, याची शहानिशा न करताच घरकुल मंजूर केले. त्यामुळे त्यांनी आपल्या पदाची जबाबदारी पार पाडताना कर्तव्यात कसूर केल्याने विभागीय आयुक्त डॉ माधवी खोडे चवरे ह्यांनी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई केली. याकरिता जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा चौकशी अहवाल देखील विचारात घेतल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 8 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे