Breaking
ब्रेकिंग

गुंडागर्दी करणाऱ्या गावगुंडाचा नागरिकांनी केला खात्मा ; सेलू (मुरपाड) येथील घटना

2 0 3 7 4 8

किशोर कारंजेकर

वर्धा : – सततच्या त्रासाला कंटाळून गावकऱ्यांनी गावगुंडाची हत्या केल्याची घटना हिंगणघाट तालुक्यातील सेलू(मुरपाड) येथे काल बुधवारला रात्रीच्या सुमारास घडली. आकाश उल्हास उईके(वय३०) असे “त्या” गावगुंडाचे नाव असून याप्रकरणी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. या घटनेत जवळपास १८ ते २० नागरिकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती पोलिस सुत्रांनी दिली आहे.

    मृतक आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर चोरी, गुंडागर्दी करीत दहशत निर्माण करणे अशाप्रकारचे अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. तो नुकताच चार दिवसांपुर्वी एका गुन्ह्यात कारागृहातून सुटका होवून बाहेर आला होता. हिंगणघाट शहरातील एका कुख्यात गुन्हेगाराशी त्याचे संबंध असून गावातील नागरिक त्याच्या कारवायामुळे त्रस्त होते.

काल ता.९ रोजी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान तो मद्यधुंद अवस्थेत गावातीलच काही दारू विक्रेत्यांकडे दारूसाठी गेला, परंतु त्याला दारु न मिळाल्याने त्याने काही लोकांना त्रास देत दहशत निर्माण केली. यादरम्यान एका युवकाच्या मोटरसायकलला त्याने लात मारून खाली पाडले. यानंतर तो पुन्हा वाद करीत स्थानिक ग्रामपंचायत समोरील चौकात पोहचला. यावेळी तेथे उपस्थित तरुणांशी त्याने पुन्हा वाद घातला. त्याच्या अशाप्रकारच्या सततच्या त्रासाला कंटाळून काही तरुणांनी त्याला वीट मारत यावेळी जखमी केले. दरम्यान काहिंनी लाठ्याकाठ्या हातात घेऊन त्याला बेदम चोप दिला. यात जखमी झालेल्या त्या गावगुंडास उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, परंतु तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

    याप्रकरणी पोलिसांनी गावातील शरद अशोक सातपुते, गजानन सुर्यभान खडसे, प्रकाश सूर्यभान खडसे, पांडुरंग मारोती देवतळे अशा चौघांना ताब्यात घेतले असून याप्रकरणी पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहेत.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 3 7 4 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे