तडीपार गुंड स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

वर्धा : वायगाव (निपाणी) येथे अवैध दारू विक्री करणारा इसम रत्नाकर रंगराव रेवतकर, वय 48 वर्षे रा. वायगाव (निपाणी) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी अटक केली आहे.
तो गावात दारू विक्री करीत असल्याने पोलिसांनी वारंवार कारवाई करून सुद्धा त्याने त्याचा अवैध दारू विक्री व्यवसाय बंद केला नाही. त्यामुळे पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावावरून आरोपीस मा. उप विभागीय अधिकारी वर्धा यांनी 28 डिसेंबर 2021 पासून 2 वर्ष कालावधीकरिता वर्धा जिल्हा हद्दीतून हद्दपार केले होते. पण तरीही हो कायद्याला धाब्यावर ठेऊन परिसरात वावरत होता अखेर स्थानिक गुन्हे शाखेने देवळी हद्दीत पेट्रोलिंगदरम्यान रेकॉर्डवरील गुन्हेगार चेकिंग करित असताना आरोपीला वायगाव येथे अटक केली.
देवळी पोलीस ठाण्यात त्याचेविरुध्द कलम 142 म.पो.का. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक नुरुल हसन, एडि. पोलीस अधीक्षक सागर कवाडे यांच्या आदेशाने पो. नि. संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनात संतोष दरगुडे, राजेश तिवसकर, विकास अवचट, राकेश आष्टनकर, संघसेन कांबळे यांनी केली.