Breaking
ब्रेकिंग

दीपचंद चौधरी विद्यालयात शासकीय योजनांचा जागर

2 6 8 7 4 6

सेलू : – शासनाच्या निर्देशानुसार स्थानिक दीपचंद चौधरी विद्यालयात आज शनिवारी शासकीय योजनांचा जागर करण्यासाठी पालक सभा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी विद्यार्थ्यांसाठी शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकारच्या योजनांची पालकांना सविस्तर माहिती देण्यात आली.

    यावेळी शासकीय योजनांचा जागर करण्यासाठी आयोजित पालक सभेच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे तर प्रमुख अतिथी मुख्याध्यापिका सुहासिनी पोहाणे, उपमुख्याध्यापिका मकरंदे, पर्यवेक्षक विजय चांदेकर, बी जी खंडागळे सर प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते. याप्रसंगी मुख्याध्यापिका पोहाणे आणि उपमुख्याध्यापिका मकरंदे मॅडम यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी शासनस्तरावर राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती दिली. शासनाकडून विद्यार्थ्यांसाठी एकूण ३९ प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात. ज्यात प्रामुख्याने पुस्तक पेढी योजना, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, बारावी पर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षणासह शासनाच्या विविध योजनांचा समावेश आहे. यावेळी व्हॉईस ऑफ मीडियाचे तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळा व्यवस्थापन विविध शासकीय योजनांचा लाभ विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी जी धडपड करते, ती खरंच कौतुकास्पद आहे, यासोबतच त्याकरिता राबणाऱ्या शिक्षकांचे देखील यावेळी कौतुक केले. यावर्षी शाळेने दहावीच्या परीक्षेत अभुतपुर्व असे यश संपादित केल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच शिक्षकांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

     सदर पालक सभेचे संचालन इयत्ता नववीचे वर्गशिक्षक मिथुन हांडे यांनी तर आभार पर्यवेक्षक विजय चांदेकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 6 8 7 4 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे