खंडणीखोर मंगेश चोरेचे पीसीआर सत्र संपता संपे ना : घेतले गेले त्याचे व्हाईस सॅम्पल

किशोर कारंजेकर
वर्धा : – खंडणीखोर मंगेश चोरे ह्याला शहर पोलिसांनी खंडणीच्या गुन्ह्याखाली अटक करीत न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज बुधवारी दिला. त्यामुळे महाठग मंगेश चोरे ह्याचा सध्याचा मुक्काम शहर पोलीस ठाण्यात असणार आहे.
वर्धा शहर पोलीस ठाण्यात आरोपी मंगेश चोरे विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. खासदारपुत्र पंकज तडस यांच्या विरोधात एका महिलेच्या मदतीने कुंभाड रचत एक लाख रुपयांची खंडणी उकळल्या संदर्भात महिनाभरा पूर्वीच तक्रार दाखल करण्यात आली होती. सदर प्रकरणात खंडणीखोर आरोपी मंगेश चोरे ह्याला शहर पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले. ह्या प्रकरणात आरोपी मंगेश चोरे व संबंधित महिलेच्या कटकारस्थानाच्या संभाषणाची पुष्टी करण्यासाठी पोलिसांनी चोरे ह्याच्या आवाजाचे नमुने घेतल्याचे कळते. यासोबतच संबंधित आडियो क्लिप संदर्भातील तपासाच्या अनुषंगाने पोलिसांना आरोपीची पोलीस कस्टडी आवश्यक होती. पोलिसांनी आज बुधवारी त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने उद्या म्हणजेच गुरुवार ता. ९ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे सध्या खंडणीखोर मंगेश चोरे ह्याचा मुक्काम शहर पोलीस ठाण्यात असणार आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ सागर कवडे यांच्या निर्देशानुसार पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय दिलीप तिजारे करीत आहे.