Breaking
ब्रेकिंग

“आरके”च्या नादी “शरद” लागल्यानचं फाटला शेतकरी महिला निधी बॅंकेचा डोंगा..! : 40 दिवसानंतरही बॅंकाच्या शाखेत खडखडाट, खातेदारांत आक्रोश

2 2 9 3 6 2

सचिन धानकुटे

सेलू : – “आरके” नामक भामट्याने शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या सुरक्षा ठेवीचा अपहार केला आणि अख्खीच्या अख्खी बॅंकचं रसातळाला गेली. बॅंकेच्या सुरक्षा ठेवीतून वंडरलॅड वॉटरपार्क मधल्या वस्तू खरेदी करण्यात आल्यात. त्याकरिता खातेदारांच्या पैशाचा अपहार करीत तो बिनधास्तपणे वापरण्यात आलायं. एकंदरीतच बॅंक बुडण्यामागचा झारीतील शुक्राचार्य हा दुसरा तिसरा कुणीही नसून कांबळे परिवारातील “आरके”चं असल्याचे आता समोर आले आहे. शरद हा “आरके”च्या नादी लागल्यानचं शेतकरी महिला निधी लिमिटेडचा डोंगा फाटला असून 40 दिवसानंतरही बॅंकाच्या शाखेत खडखडाट असल्याने खातेदारांत संतापाची लाट निर्माण झाली आहे. 

      शेतकरी महिला निधी लिमिटेड ही आपल्या अधिकच्या व्याजदरामुळे जिल्ह्यात अल्पावधीतच लोकप्रिय ठरली होती. त्यामुळे अनेकांनी आपली आयुष्यभराची जमा पुंजी बॅंकेच्या मढ्यावर घातली. दरम्यान बॅंक चालायला लागली अन् शाखाही वाढत गेल्यात, परंतु कच्च्या कानाच्या अध्यक्ष शरद कांबळे ह्याने आपल्या रोशन नामक भावाच्या नादी लागून बॅंकेचं पार वाटोळं करून टाकलं. अगदी सुस्थितीत असणारी बॅंक एका चुकीच्या निर्णयामुळे आजमितीस डबघाईस आली आहे. भूसंपादन घोटाळ्यातील रक्कमेवर अचानक रोशन कांबळेची नजर पडली आणि त्याने आपल्या “येडा फूफाटा” असलेल्या भावालाही नादी लावले. ती आयती रक्कम येणार म्हणून दोन्ही भामट्यानी बॅंकेची 2 कोटी 17 लाख रुपयांची सुरक्षा ठेव चक्क आपल्या वंडरलॅड वॉटरपार्कसाठी वापरली. नेमकं त्याचवेळी भूसंपादन घोटाळा उघडकीस आला अन् बॅंक चौकशीच्या फेरीत अडकली.

       ही बाब जगजाहीर होताच खातेदारांच्या बँकेत पैशासाठी रांगा लागल्यात. दरम्यान ता.10 एप्रिल रोजी खातेदार, अभिकर्ता आणि काही शाखेचे व्यवस्थापक ह्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात धडक दिली. खातेदारांना एरव्ही चकमा देऊन थापा मारणारा अध्यक्ष शरद कांबळे हा देखील पोलिसांचा हिसका बसताच त्याठिकाणी हजर झाला. यावेळी झालेल्या तडजोडीअंती त्याने पाचशे रुपयांच्या मुद्रांकावर कमीतकमी 30 आणि जास्तीत जास्त 45 दिवसात स्वतःची संपत्ती विकून खातेदारांना पैसे देण्याचं अभिवचन दिलं. दरम्यानच्या काळात अध्यक्ष शरद कांबळे ह्याने आपली काही संपत्ती देखील विकली. परंतु अद्यापही सेलू येथील बॅंकेच्या शाखेत 40 दिवसानंतरही खडखडाट आहे. साधी एक दगडी सुद्धा सेलू शाखेला देण्यात आली नाही हे विशेष..! एकंदरीत त्यामुळे खातेदारांत चांगलाच आक्रोश निर्माण झाला असून येत्या 25 मे पर्यंत दिलेल्या मुदतीत सेलू शाखेत पैसे न आल्यास येथील खातेदारांनी वंडरलॅड वॉटरपार्कवर कब्जा केल्यास नवलं वाटायचं कारण नाही. 

 

*बॅंकेच्या सुरक्षा ठेवीचा अपहार*

   शेतकरी महिला निधी लिमिटेडच्या सुरक्षा ठेवीला आपल्या “बा”ची खाजगी मालमत्ता समजून अध्यक्ष शरद कांबळे ह्याने अपहार केला. त्याने कोणत्या अधिकाराचा वापर करुन ती वंडरलॅड वॉटरपार्कसाठी वापरली हे अद्याप कळायला मार्ग नाही. वंडरलॅड वॉटरपार्क मधल्या वस्तू खरेदी करण्यासाठी बॅंकेची सुरक्षा ठेव जर वापरली नसती तर कदाचित बॅंक आजही सुस्थितीत असती. परंतु “आरके”च्या नादी लागून शरदने बॅंकेचे नावं अख्ख्या जिल्ह्यात रोशन केलं हेही नसे थोडके..!

 

बॅंकीग सिस्टममधल्या पैशाचाही अपहार

बॅंकेच्या एकूण शाखा 9 आहेत. त्यापैकी सेलू, आर्वी, वर्धा, कारंजा, तिवसा, वरूड, मोर्शी ह्या सात शाखाचा बॅंकेच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा आहे. सेलू आणि आर्वी शाखेत प्रत्येकी 7 कोटी, वर्धा शाखेत 6 कोटी, कारंजा, वरूड आणि तिवसा या शाखेत प्रत्येकी 2 कोटी तर मोर्शी शाखेत 30 लाख रुपये खातेदारांचे अडकले आहेत. या एकूण 26 कोटी रुपयापैकी कर्जाचे 5 कोटी आणि सुरक्षा ठेवीचे 2 कोटी 17 लाख रुपये जरी बाजूला ठेवलेत तरी उर्वरित पैसा शरद आणि रोशन नामक दोन्ही भामट्यानी वंडरलॅड वॉटरपार्कमध्येच ओतल्याचे आजघडीला स्पष्ट दिसत आहे.

4/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 2 9 3 6 2

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे