Breaking
ब्रेकिंग

‘व्हॉइस ऑफ मीडियाची’ राज्य कार्यकारिणी जाहीर : विदर्भातून आनंद अंबेकर, सुधीर चेके, प्रकाश कथले, सुनील कुहीकर, रोहिदास राऊत यांच्यावर राज्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी

2 0 8 9 8 8

 

मुंबई (प्रतिनिधी) : ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ची राज्य कार्यकारणी झाली घोषीत झाली असून, त्यात विदर्भातून आनंद अंबेकर, सुधीर चेके, प्रकाश कथले, सुनील कुहीकर, रोहिदास राऊत, अनिल बाळसराफ, संजय तिपाले, नितीन पखाले, अनिल पाटील यांच्यावर राज्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

देशभरात अल्पावधीत नावारूपास येऊन सुमारे छत्तीस हजार पत्रकार सदस्य असलेल्या ‘व्हॉइस ऑफ मीडिया’ या संघटनेच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीची घोषणा ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के केली आहे.

संघटनेच्या कार्याध्यक्षपदी नंदकुमार सुतार, संतोष शाळीग्राम यांना संधी देण्यात आली आहे. उपाध्यक्षपदी विलास आठवले, तुकाराम झाडे, प्रकाश कथले, जयप्रकाश दगडे यांची निवड करण्यात आली आहे. दुर्गेश सोनार आणि ‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या शिक्षण विभागाचे मुख्य समन्वयक चेतन कात्रे हे संघटनेचे सरचिटणीस असतील. खजिनदारपदी गजानन देशमुख, राज्य समन्वयकपदी संजय मिस्किन यांची निवड करण्यात आली आहे. संदीप महाजन यांची पत्रकार हल्ला विरोधी फोरम राज्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजेंद्र थोरात यांची राज्य उपाध्यक्ष तथा मुंबई विभाग समन्वयक पदीही निवड करण्यात आली आहे. कोकण विभागाचे समन्वयक म्हणून फिरोज पिंजारी यांची निवड करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्राच्या विभाग समन्वयक पदी तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून अजित कूकुलोळ यांची निवड. सुरेश उज्जैनवाल यांची उत्तर महाराष्ट्र विभाग तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून निवड. संजय मालानी यांची मराठवाडा विभाग समन्वयक तथा राज्य उपाध्यक्ष म्हणून म्हणून निवड. आनंद आंबेकर यांची राज्य उपाध्यक्ष तथा विदर्भ विभाग समन्वयक म्हणून निवड. संघटनेचे राज्य कार्यवाहक म्हणून बालाजी मारगुडे व यास्मिन शेख यांना संधी देण्यात आली आहे. ओमकार वाबळे, नागोराव भांगे, सुधीर चेके, विजय पाटील, सुनील कुहिकर, प्रशांत शर्मा यांच्यावर राज्य संघटक पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राज्य प्रसिद्धी प्रमुख म्हणून राजेश्वर पालमकर हे काम पाहतील. प्रवक्ता म्हणून रोहिदास राऊत जबाबदारी सांभाळतील. सहसरचिटणीस पदी डॉ. ज्ञानेश्वर भाले, पंढरीनाथ बोकारे, अनिल बाळसराफ यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सहकार्यवाहक म्हणून सुरज कदम, व्यंकटेश वैष्णव, संजय तिपाले व नितीन पखाले यांना संधी देण्यात आली आहे. सदस्य म्हणून नूर अहमद, अनिल पाटील, रमेश दुरुगकर, एकनाथ चौधरी, चेतन व्यास, अंकुश वाकडे, विश्वनाथ देशमुख, प्रकाश दांडगे, नरेश होळणार, सिद्धेश्वर पवार, सयाजी शेळके, ओमकार नागांवर, किशोर मोरे, बाळू कोकाटे, महेश पाटील, प्रमोद बऱ्हाटे, शरद लोणकर यांची निवड करण्यात आली आहे. या संघटनेचे मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील नामवंत संपादक, ज्येष्ठ मंडळी राहणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ संपादक कुमार केतकर, राही भिडे, जयश्री खाडीलकर, भरतकुमार राऊत, श्रीराम पवार, श्रीपाद अपराजित, रवींद्र आंबेकर, प्रसन्न जोशी, विद्या विलास पाठक, शरद कारखानीस, राधेश्याम चांडक, श्रीकृष्ण चांडक मुख्य मार्गदर्शक आहेत. 

प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के यांनी सर्वाना शुभेच्छा देत आगामी काळात संघटना बांधणी आणि पत्रकारांसाठी महत्वाचे उपक्रम घेऊन आम्ही येत आहोत असे सांगितले.

‘व्हॉइस ऑफ मीडिया’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे प्रमुख संदीप काळे, संजय आवटे, मंदार फणसे, धर्मेंद्र जोरे, डॉ. नरेंद्र बोरलेपवार, चंद्रमोहन पुप्पाला, चेतन बंडेवार, शंतनू डोईफोडे, सुधीर लंके, परवेज खान, अश्विनी डोके, दिव्या पाटील यांनी नूतन कार्यकारिणीचे अभिनंदन केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
2 0 8 9 8 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे