Breaking
ब्रेकिंग

भरधाव ट्रॅव्हल्सची उभ्या टँकरला भीषण धडक ; एकाचा मृत्यू तर पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी

1 9 7 0 5 5

सचिन धानकुटे

वर्धा : – भरधाव ट्रॅव्हल्स उभ्या टँकरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू तर पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास जिल्ह्यातील बरबडी-जसापूर फाट्याजवळ घडली. 

     प्राप्त माहितीनुसार, महाराजा कंपनीची एम एच ३४ बीझेड ०००९ क्रमांकाची खाजगी ट्रॅव्हल्स प्रवाशांना घेऊन राजूरा येथून नागपूरच्या दिशेने निघाली होती. यावेळी वर्धा जिल्ह्यातील जाम ते बुट्टीबोरी दरम्यानच्या बरबडी-जसापूर फाट्याजवळ एम एच ०४ एफयू २०४५ क्रमांकाचा टँकर रस्त्याच्या कडेला उभा होता. नागपूरच्या दिशेने जाणारी भरधाव ट्रॅव्हल्स त्या उभ्या टँकरवर जोरात आदळली. ही घटना आज सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात खाजगी बसचा समोरील भाग अक्षरशः क्षतिग्रस्त झाला. सदर अपघातात पाच ते सहा प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना नागपूर येथील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे सांगितले जाते. जखमीमध्ये चालक वाहकासह प्रवाशांचा देखील समावेश आहे. नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार बल्लारपूर पेपर इंडस्ट्रीजमध्ये कार्यरत धिरज कुलकर्णी (वय४८) यांचा सदर अपघातात मृत्यू झाल्याचे सांगितले जाते. यातील किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारानंतर सुट्टी देण्यात आली आहे तर गंभीर जखमीवर उपचार सुरू आहेत. सिंदी पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहे.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 9 7 0 5 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे