Breaking
ब्रेकिंग

शाळकरी विद्यार्थ्यांच्या दोन गटात तूफान राडा ; मारण्यासाठी उगारले धारदार शस्त्र ; यशवंत विद्यालयाच्या प्रवेशद्वारा समोरील घटना

1 8 2 0 3 6

सचिन धानकुटे

सेलू : – शाळकरी विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान राडा झाल्यानंतर मारण्यासाठी चक्क धारदार शस्त्र उगारण्यात आल्याची घटना आज स्थानिक यशवंत विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर घडली. पोलिसांनी घटनास्थळी वेळीच धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. परंतु सदर प्रकारामुळे शाळा परिसरात विद्यार्थ्यांना मारहाणीचे तर प्रशिक्षण दिले जात नाही ना.. असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

    स्थानिक यशवंत विद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर नेहमीच टवाळखोरांचा गोतावळा असतो. यशवंत विद्यालय, महाविद्यालय तसेच आयटीआय कॉलेज ह्याच रस्त्यावर असल्याने शाळा कॉलेज सुटण्याच्या वेळेवर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. यशवंत शाळेच्या समोरच बसचा थांबा आणि ऑटो स्टॅन्ड देखील असल्याने तेथेही बऱ्यापैकी गर्दी असते. आज शुक्रवारी पाच वाजताच्या सुमारास सदर शाळा सुटली आणि त्या गर्दीत विद्यार्थ्यांच्या दोन गटात मोठा राडा झाला. दरम्यान दुचाकीवरून आलेल्या विद्यार्थ्यांनी दहावीच्या एका विद्यार्थ्यांस बेदम मारहाण केली. यावेळी दोन्ही गटात हा राडा सुरू असतानाच एकाने हातात धारदार शस्त्र उगारले. तेव्हा तेथील उपस्थितांनी सदर वाद सोडवण्यासाठी प्रयत्न करीत याप्रकरणी पोलिसांना माहिती दिली. शेवटी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राडा करणाऱ्या त्या विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यात नेले आणि आपल्या पद्धतीने समज दिली.

   शाळा परिसरात हाणामारीसाठी विद्यार्थ्यांनी चक्क धारदार शस्त्राचा वापर केल्याने त्यांना शाळेत मारामारीचे तर प्रशिक्षण दिले जात नाही ना.. असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. यासोबतच त्यांच्याकडे घटनास्थळी शस्त्र उपलब्ध असल्याने सदर राडा हा पूर्वनियोजित तर नव्हता ना.. अशीही शंका व्यक्त होत आहे. याप्रकरणी वादाचे कारण मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.

4.5/5 - (2 votes)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
1 8 2 0 3 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे